मुंबई भाजपा महिला मोर्चातर्फे 'नारी शक्ती वंदन'; युवक, युवती पदयात्रेचे आयोजन
By मनोहर कुंभेजकर | Published: March 5, 2024 07:53 PM2024-03-05T19:53:21+5:302024-03-05T19:53:29+5:30
देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक योजना राबविल्या जात आहेत.
मुंबई- देशातील महिलांच्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई भाजपामहिला मोर्चातर्फे 'नारी शक्ती वंदन' युवक व युवती पदयात्रेचे आयोजन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. पदयात्रेला युवती तसेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खा. मनोज कोटक, खा. पूनम महाजन, आ. पराग अळवणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक योजना राबविल्या जात आहेत. भगिनींच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्यासाठी भाजपा नेहमीच प्रयत्नशील आहे.नारी शक्तीचा आणि महिलेचा खरा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाला आहे. महिला सक्षमीकरण करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना विद्यमान सरकारने सुरु केल्या. त्याचेच यश म्हणून शेकडो महिला आत्मनिर्भर होत आहेत. यातून महिलांचा विकास साधण्याचे काम झाले आहे. त्यामुळे भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले. अभियान यशस्वी होण्यासाठी मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शितल गंभीर, माजी नगरसेविका अलका केरकर, हेतल गाला, स्वप्ना म्हात्रे, मुंबई महिला महामंत्री बिंदू त्रिवेदी, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या योजना ठोकळे आदींसह बचत गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.