नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 08:04 AM2024-09-25T08:04:56+5:302024-09-25T08:05:28+5:30

मंत्रालयानजीकच्या रस्त्यावरील ताण होणार कमी

Nariman Point will dump the fill into the sea | नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज

नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज

मुंबई : दक्षिण मुंबईतील बॅकबे रेक्लमेशन योजनेतील ब्लॉक तीन आणि चार यांचा कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या एमएमआरडीए प्राधिकरणाच्या १५८ व्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. 

मंजुरी देण्यात आलेल्या सुधारित आराखड्यानुसार या भागातील विधानभवनाच्या विस्तार प्रकल्पासह नरीमन पॉइंट ते जगन्नाथ भोसले मार्ग अशा नवीन मार्गाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचबरोबर नरिमन पॉइंट येथे कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्पासह विविध सांस्कृतिक सोयीसुविधांचाही विकास केला जाणार असून त्यासाठी समुद्रात भराव घालण्यात येणार आहे.

बॅकबे रेक्लमेशन योजनेच्या भागात सुरु असलेल्या सरकारी आणि खासगी संस्थांच्या प्रकल्पांच्या म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि मेट्रो प्रकल्पांच्या अनुषंगाने यापूर्वीच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. तसेच हा मसुदा निवासी आणि व्यावसायिक अशा भागात विभागण्यात आला आहे. समुद्रकिनारे आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

मंत्रालयानजीकच्या रस्त्यावरील ताण होणार कमी

विधानभवन आणि मंत्रालयाजवळील सध्याच्या रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र मार्गाच्या नरीमन पॉइंटजवळून ते जगन्नाथ भोसले मार्ग यांना जोडणी देण्यासाठी नवीन रस्त्याची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक अधिक सुटसुटीत होणार आहे. 

यापूर्वी या भागात सागरी सेतू उभारण्याचे नियोजन होते. मात्र मच्छीमारांच्या विरोधानंतर त्यात बदल करून आता कोस्टल रोड उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आता हा सुधारित प्रारूप आराखडा नागरिकांच्या सूचना 
मागविण्यासाठी प्रसिद्ध केला जाणार आहे, असेही एमएमआरडीएच्या  अधिकाऱ्यांनी सांगितले.

मच्छीमारनगर येथे मच्छीमारांच्या बोटींच्या पार्किंगसाठी सुविधा 

तसेच रेस्टॉरंट आणि अन्य सुविधांची निर्मिती
विशिष्ट थीमवर आधारित समुद्रात कारंजांची निर्मिती
आयकॉनिक शिल्पांची निर्मिती, समुद्रतटावर बसण्यासाठी पायऱ्यांची सुविधा
अंडरवॉटर ओशनारियमची निर्मिती, 
कल्चरल प्लाझाजवळ व्ह्यू पॉइंटची उभारणी 

या नव्या सुविधा उभ्या राहणार

कल्चरल प्लाझाची उभारणी

नरिमन पॉइंट येथे मरिना प्रकल्पात बोटी आणि नौकांसाठी खास बंदराची निर्मिती

सँड कॅसलची उभारणी

पब्लिक प्लाझा, पेट पार्क, नाना नानी पार्क

सार्वजनिक जीम

फिशरमेन कॉलनी पार्क

खाद्यपदार्थांचे स्टॉल
 

Web Title: Nariman Point will dump the fill into the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.