Join us

#KamalaMillsFire: बाहेर पडण्याचा अरुंद मार्ग ठरला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:35 AM

मुंबई : लोअर परळ येथील ‘वन अबाव्ह’ रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री गेलो होतो, रात्री १२.३०च्या सुमारास आग लागल्याची ओरड कानावर आली.

मुंबई : लोअर परळ येथील ‘वन अबाव्ह’ रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री गेलो होतो, रात्री १२.३०च्या सुमारास आग लागल्याची ओरड कानावर आली. आग लागली त्या वेळेस १५० च्या आसपास माणसे रेस्टॉरंटमध्ये होती. आम्ही ७-८ भावंडांनी मिळून त्या रेस्टॉरंटमध्ये गेट-टुगेदर प्लान केला होता. रेस्टॉरंटच्या वरच्या भागावरून आग पसरत होती, सगळे जण जीव वाचविण्यासाठी एकाच ‘एक्झिट’मधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. मात्र बाहेर पडण्याचा रस्ता खूपच अरुंद असल्याने बरीच चेंगराचेंगरी झाली. पण दुसरा कोणताच मार्ग नसल्याने आम्ही हतबल झालो होतो. त्या वेळेस बºयाच तरुणींनी मदत मिळावी म्हणून आरडाओरडाही केला, पण कुणाचेच साहाय्य मिळत नव्हते.आग वाढत चालली होती, बरीच माणसे बाथरूममध्ये अडकली होती. आगीचे लोट माझ्या अंगावरही आले, पाठीमागून शर्टाला आग लागली अन् काही वेळातच मानेलाही भाजले. आग पसरत चालल्याने खूप भीतीचे वातावरण झाले होते, टेबलवरून उडी मारूनही प्राण वाचवू शकत नव्हतो, कारण संपूर्ण टेबल्सवर काचेच्या ग्लासांचे सेटअप करून ठेवले होते. मग हळूहळू कसेबसे जीव वाचवीत आम्ही बाहेर पडलो. रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निरोधक यंत्रणा दिसली नाही, हे चुकीचे आहे. एवढ्या मोठ्या दर्जाच्या रेस्टॉरंटमध्ये अशी यंत्रणा असणे अत्यंत आवश्यक आहे. या अपघतात मी २० टक्के भाजलो आहे, तर एक भाऊ ४०-५० टक्के भाजला आहे आणि दुसरा भाऊ अमित शहा हा परदेशातून भारतात आला होता, तोही जखमी झाला आहे. अमित खूप काळानंतर भावांना भेटणार होता. त्यासाठी हे गेट-टुगेदर प्लान केले होते. रेस्टॉरंटच्या जागी रुफटॉपवर ताडपत्री असल्याने आगीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. आग लागल्याची वार्ता ऐकल्यानंतर पाऊण तासाने बाहेर पडलो. त्यानंतर कुणी रुग्णालयात दाखल केले, याविषयी काही लक्षात नाही.>पारदर्शक व निष्पक्ष चौकशीमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आजपासूनच कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रथमदर्शी जबाबदार अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल लवकरच सादर करण्यात येईल. ही चौकशी पारदर्शक व निष्पक्ष असेल. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.- अजय मेहता,मुंबई महापालिका आयुक्त>पहिलीच जलद कारवाईगेल्या काही महिन्यांत आगीच्या अनेक घटना घडल्या. तीन वर्षांपूर्वी कुर्ला येथील किनारा रेस्टॉरंटमध्ये आगीची घटना घडली होती. त्यात महाविद्यालयीन मुलांचा दुर्दैवी अंत झाला होता. अंधेरी येथील मेडिकल स्टोअरला लागलेली आग आणि १८ डिसेंबरला साकीनाका येथील आगीच्या दुर्घटनेनंतरही सूत्र इतक्या वेगाने हलली नव्हती. मात्र गुरुवारी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद देशाची राजधानी दिल्लीतही उमटल्यानंतर तत्काळ पाच अधिकाºयांचे निलंबन करण्यात आले. अशा प्रकारची ही पहिलीच जलद कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवकमलामिल्स