ठाणो : आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीत कांस्यपदक पटकावणा:या नरसिंह यादववर सध्या पोलिस दलातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ठाणो (जिल्हा) ग्रामीण पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक असलेल्या यादवने 74 किलो वजनी गटात कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
मुंबईकर असलेल्या नरसिंहने 2क्1क् मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये पोलीस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) निवड केली. 2क्13 मध्ये महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी येथून प्रशिक्षण पूर्ण करून ते 1 जुलै 2क्14 पासून ते ठाणो ग्रामीण (जिल्हा) येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्तीस आहेत.
त्यांनी ‘एसएआय स्पोर्ट्स अॅकॅडमी ऑफ इंडिया’ येथे कुस्तीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील पंचम यादव यांचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे.
यादव यांचे कुस्तीतील प्राविण्य विचारात घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता 8 जुलै 2क्14 रोजी नवी दिल्ली येथे जाण्याची परवानगी दिली होती. कांस्यपदक जिंकल्याबद्दल ठाणो ग्रामीण (जिल्हा) अधीक्षक राजेश प्रधान, अपर पोलीस अधीक्षक अविनाश अंबुरे आदी अधिकारी
तसेच कर्मचा:यांनी त्यांचे अभिनंदन
केले. (प्रतिनिधी)