सोशल मीडियावर गुंजतेय राष्ट्रगीताची चित्रफीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:45 AM2017-08-15T01:45:28+5:302017-08-15T01:45:31+5:30

७१व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ समूहाने त्रिनयनी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रगीताची वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिचित्रफीत तयार केली

National anthem on social media | सोशल मीडियावर गुंजतेय राष्ट्रगीताची चित्रफीत

सोशल मीडियावर गुंजतेय राष्ट्रगीताची चित्रफीत

Next

मुंबई : ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ समूहाने त्रिनयनी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रगीताची वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिचित्रफीत तयार केली आहे. ‘सर्वसमावेशक भारत’ अशी संकल्पना असलेल्या या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १० आॅगस्ट रोजी अनावरण झालेली ही ध्वनिचित्रफीत सध्या फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर #ी‘ुँं१ं३ या हॅशटॅगसह ट्रेंडिंगमध्ये आहे.
राष्ट्रगीताच्या या ध्वनिचित्रफितीत दिव्यांग व्यक्तींसह एलजीबीटीक्यू आणि अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांचा समावेश आहे. या ध्वनिचित्रफितीद्वारे ‘लोकमत’ आणि ‘त्रिनयनी’ यांनी समाजातील या ‘विशेष’ घटकांचे योगदान अधोरेखित करून त्यांची प्रशंसा केली आहे. या ध्वनिचित्रफितीने युट्यूबवर आतापर्यंत ५८ हजार ६३२ व्ह्यूज मिळविले आहेत. ‘त्रिनयनी’ संस्थेच्या संस्थापिका आणि गायिका रितिका साहनी यांच्या सहकार्याने ही ध्वनिचित्रफीत चित्रित करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश करण्यासाठी संघर्ष केला जात आहे.
एका शाळेच्या आवारात या ध्वनिचित्रफितीचे चित्रीकरण पार पडले. या प्रक्रियेत १७ निरनिराळ्या क्षेत्रांतील ३० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित आणि कर्मवीरचक्र पुरस्कार विजेती स्नेहा जावळे, राज्यातील सुवर्णपदक विजेता दिव्यांग जलतरणपटू आणि व्हीलचेअरवर बास्केटबॉलचे मैदान गाजवणारा राहुल रामुगडे, मिस व्हीलचेअर इंडिया ठरलेली निनू केवलानी, राज्यस्तरीय पॅराआॅलिम्पिक पदक विजेता रमेश मिश्रा यांचा सहभाग आहे.

Web Title: National anthem on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.