राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 05:44 PM2023-03-02T17:44:04+5:302023-03-02T17:44:23+5:30

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार

National award-winning films will now get double subsidy; Announcement by Minister Sudhir Mungantiwar | राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

googlenewsNext

मुंबई: चित्रपटासाठी देण्यात येणारे अनुदान ३ महिन्यांच्या आत देणं आता बंधनकारक करणार असून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना यापुढे दुप्पट अनुदान देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, केवळ २ वर्षाच्या आतील चित्रपट हे अनुदानासाठी पात्र राहणार असून, प्रेरणादायी चित्रपटांसाठी आता १ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देण्यात येईल, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. 
 
२०२०- २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनुदानासाठी अर्ज करण्यात आलेल्या एकाही  चित्रपटांचं परीक्षण करण्यात आलं नाही याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं. स्क्रीनिंग साठी थियेटर एकच असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. ही संख्या वाढावी यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. चित्रपट अनुदानपात्रतेसाठी चौकट आखली जात आहे, तसंच या अनुदानात काही बदल प्रस्तावित आहेत त्याचप्रमाणे प्रेरणादायी चित्रपटांसाठी एक कोटीपेक्षा जास्त अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

Web Title: National award-winning films will now get double subsidy; Announcement by Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.