आॅल इंडिया बँक एम्ल्पॉइज असोसिएशनतर्फे मुंबईत १९-२0 नोव्हेंबरला राष्ट्रीय बँकिंग परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:05 AM2017-10-26T05:05:55+5:302017-10-26T05:06:18+5:30

मुंबई : ‘जनतेचा पैसा, जनतेच्या भल्यासाठी’ हा मध्यवर्ती मुद्दा घेऊन ‘आॅल इंडिया बँक एम्ल्पॉइज असोसिएशन’तर्फे १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबईत राष्ट्रीय बँकिंग परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे सहसचिव देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.

The National Banking Council, organized by All India Bank Employees Association in Mumbai on November 19-20, | आॅल इंडिया बँक एम्ल्पॉइज असोसिएशनतर्फे मुंबईत १९-२0 नोव्हेंबरला राष्ट्रीय बँकिंग परिषद

आॅल इंडिया बँक एम्ल्पॉइज असोसिएशनतर्फे मुंबईत १९-२0 नोव्हेंबरला राष्ट्रीय बँकिंग परिषद

Next

मुंबई : ‘जनतेचा पैसा, जनतेच्या भल्यासाठी’ हा मध्यवर्ती मुद्दा घेऊन ‘आॅल इंडिया बँक एम्ल्पॉइज असोसिएशन’तर्फे १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबईत राष्ट्रीय बँकिंग परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे सहसचिव देवीदास तुळजापूरकर यांनी दिली. या परिषदेत बचत खात्याचे व्याज वाढविणे, सेवा शुल्क कमी करणे आणि किरकोळ कर्जावरचे व्याजदर कमी करणे या मागण्यांचे काय झाले? सरकार कर्ज बुडव्या बड्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याचे का टाळत आहे? मोठ्या उद्योगांना मोठमोठी कर्जमाफी का दिली जात आहे? या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
सरकारी बँकांच्या पुनर्भांडवलीकरणाचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे बँकांना कर्ज वितरित करण्याची क्षमता प्राप्त होईल. मात्र त्यासाठी कर्जाची मागणी निर्माण होणेही तितकेच आवश्यक आहे. एनपीए झाल्यामुळे काही कंपन्या अडकून पडल्या आहेत, तर काही कंपन्या विपरित आर्थिक परिस्थितीमुळे गुंतवणुकीचे धाडस करत नाहीत, असे देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

Web Title: The National Banking Council, organized by All India Bank Employees Association in Mumbai on November 19-20,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक