National Consumer Day : सायबर फसवणूक कशी टाळाल? लोकमतच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 09:55 AM2021-12-24T09:55:53+5:302021-12-24T09:58:34+5:30

'लोकमत'च्यावतीने सातत्याने समाजपयोगी आणि सामाजिक जाणीव जपत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध दिनविशेषदिनी समाजजागृतीवर मान्यवरांच्या मार्गदर्शनाची मेजवाणी आणि अभ्यासपूर्ण संवाद वाचकांना, प्रेक्षकांना ऐकायला मिळतो

National Consumer Day : How to avoid cyber fraud? Guide to Lokmat's online webinar | National Consumer Day : सायबर फसवणूक कशी टाळाल? लोकमतच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन

National Consumer Day : सायबर फसवणूक कशी टाळाल? लोकमतच्या ऑनलाईन वेबिनारमध्ये मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देकार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. रश्मी करंदीकर यांची मुलाखत शुभदा चौकर घेणार आहेत. त्यामुळे, या ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमातून आपल्या ज्ञानात भर आणि हक्कांची जाणीव करुन घेण्याच ही चांगली संधी आहे.

मुंबई - देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी ग्राहक जनजागृतीसाठी कार्यक्रम करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सायं‌ 4.30 ते 5.30 या वेळेत मुंबई ग्राहक पंचायत आणि दै. लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने  ऑन-लाईन वेबिनार घेण्यात येत आहे. या वेबिनारमध्ये 'वाढती सायबर गुन्हेगारी-फसवणूक कशी टाळाल? फसलात तर काय कराल?' या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. 

'लोकमत'च्यावतीने सातत्याने समाजपयोगी आणि सामाजिक जाणीव जपत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध दिनविशेषदिनी समाजजागृतीवर मान्यवरांच्या मार्गदर्शनाची मेजवाणी आणि अभ्यासपूर्ण संवाद वाचकांना, प्रेक्षकांना ऐकायला मिळतो. आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. डिजिटल माध्यमांमुळे, समाज माध्यमांमुळे सायबर क्राईम वाढला आहे. त्यामुळेच, 'वाढती सायबर गुन्हेगारी-फसवणूक कशी टाळाल? फसलात तर काय कराल?' या विषयावर करंदीकर यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येईल.    

दरम्यान, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि मान्यवरांचे स्वागत दै. लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव हे करतील. तर, प्रास्ताविकपर मनोगत मुंबई ग्राहक पंयायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे करणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. रश्मी करंदीकर यांची मुलाखत शुभदा चौकर घेणार आहेत. त्यामुळे, या ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमातून आपल्या ज्ञानात भर आणि हक्कांची जाणीव करुन घेण्याच ही चांगली संधी आहे. या कार्यक्रमाचे आभार मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह अनिता खानोलकर यांच्याकडून मानण्यात येईल. 

म्हणून आज साजरा करतात ग्राहक दिन

भारतात दरवर्षी 24 डिसेंबरला ‘National Consumer Day’ अर्थात ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा केला जातो. 1986मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर, सन 1991 आणि 1993मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्तीकरण्यात आली (National Consumer Day 2020 As a Consumer know your rights). त्यानंतर 15 मार्च 2003पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि, या कायद्यातसुद्धा 1987मध्ये सुधारणा करण्यात आली होती. परंतु, 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली. 2000मध्ये प्रथमच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला होता. 

Web Title: National Consumer Day : How to avoid cyber fraud? Guide to Lokmat's online webinar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई