विद्यापीठात महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय परिषद
By Admin | Published: March 28, 2015 12:15 AM2015-03-28T00:15:59+5:302015-03-28T00:15:59+5:30
दिल्ली येथील असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मुंबई विद्यापीठाच्या दूरशिक्षण संस्थेतर्फे महिलाविषयक प्रश्नांवर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : दिल्ली येथील असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि मुंबई विद्यापीठाच्या दूरशिक्षण संस्थेतर्फे महिलाविषयक प्रश्नांवर एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च रोजी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील फिरोजशहा मेहता सभागृहात होणाऱ्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन लखनौ विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. रूप रेखा वर्मा यांच्या हस्ते होईल.
३0 मार्च रोजी सकाळी १0 वाजता या परिषदेचे उद्घाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे महासचिव प्रा. फुर्कन कमर तर उद्घाटनाचे अध्यक्षपद कुलगुरू डॉ. राजन वेळूकर भूषविणार आहेत. पहिल्या तांत्रिक सत्रात महिलांची बदलती सामाजिक पार्श्वभूमी, लिंगभेद आणि हिंसा, महिलांच्या चळवळी आणि त्यांचे नेतृत्व, तसेच मानवी हक्क आणि महिला अशा विविध विषयांवर चर्चा होईल. दुपारच्या सत्रात महिलाविषयक अभ्यासक्रमातील सुधारणा आणि त्यांचे पुनरुज्जीवन या विषयावर महाचर्चा होणार असून यामध्ये एक सत्र महिलाविषयक संशोधनाच्या क्षेत्रातील प्राधान्यक्रम विषयावर असणार आहे.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रांमध्ये सायबरविश्वात महिला, प्रसारमाध्यमे आणि महिला, महिला ध्वनी तर पुरुष दृश्य : समता कशी साधणार? अशा रोचक विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलांची भूमिका आणि दर्जा, महिला, राजकारण आणि सरकार, कायदेविषयक सुधारणा, मनरेगातील महिलांचा सहभाग अशा विषयांवरही चर्चा होणार आहे.
सामाजिक विषयावरील चित्रपटासाठीचे राष्ट्रीय पारितोषिक मिळालेल्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. फ्लाविया अग्नेस या निरोपाच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.
च्३0 मार्च रोजी सकाळी १0 वाजता या परिषदेचे उद्घाटन होईल.
च्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे महासचिव प्रा. फुर्कन कमर उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षपद कुलगुरू डॉ.राजन वेळूकर भूषविणार आहेत.