नॅशनल पार्क पूर्वपदावर, अतिवृष्टीमुळे उद्यानातील ५० मोठे वृक्ष कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:29 AM2017-10-11T03:29:25+5:302017-10-11T03:29:45+5:30

२९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात पाणी साचले होते. या पुराचा तडाखा बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य कार्यालयालादेखील बसला.

 The National Park on the east, due to the overwhelm, 50 large trees in the garden collapsed | नॅशनल पार्क पूर्वपदावर, अतिवृष्टीमुळे उद्यानातील ५० मोठे वृक्ष कोसळले

नॅशनल पार्क पूर्वपदावर, अतिवृष्टीमुळे उद्यानातील ५० मोठे वृक्ष कोसळले

Next

मुंबई : २९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात पाणी साचले होते. या पुराचा तडाखा बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य कार्यालयालादेखील बसला. तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानी पुराचे पाणी भरले होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गाळदेखील साचला होता. त्यामुळे कार्यालय, अधिकारी व कर्मचाºयांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता महिनाभराने पुराच्या तडाख्यानंतर नॅशनल पार्क पूर्वपदावर आले आहे. दरम्यान, अतिवृष्टीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झालेल्या नुकसानीचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. या वेळी अर्थसाहाय्याची मागणी करणारा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी अधिकाºयांना दिली.
पुरात जीवितनाही झाली नसली तरी उद्यानातील कार्यालयीन व निवासी इमारती, त्यातील काही साहित्य, कार्यालयीन दस्तावेज, उद्यानाच्या संरक्षक भिंती आणि कुंपण, शासकीय वाहने, उद्यानातील साइन बोर्ड, होर्डिंग्ज, मिनी ट्रेनचा ट्रॅक यांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे उद्यानातील ५० मोठे वृक्ष मुळासकट कोसळले. पूरस्थितीमध्ये काही कालावधीसाठी उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. लायन सफारी, मिनी रेल्वे, कान्हेरी गुफा आणि सायकलिंग सेवा बंद करण्यात आली होती. मिनी रेल्वेचा ट्रॅक पुरामध्ये वाहून गेला होता. ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यावर असून, या आठवड्यामध्ये मिनी ट्रेन सुरू होईल, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सूत्रांनी सांगितले.
वनविभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानी दैनंदिन जीवनाच्या वस्तू पाण्यामुळे निकामी झाल्या होत्या. या पूरस्थितीची पाहणी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी केली. तेव्हा त्यांनी सर्व गोष्टी पूर्वपदावर आणण्यासाठी अधिकाºयांना सूचना दिल्या.
त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाºयांनी युद्धपातळीवर संगणकाचा डाटा रिकव्हर करणे, साफसफाई करणे इत्यादी कामे केली. सध्या विजेच्या उपकरणांच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर सुरू आहे,
असे उद्यानातील अधिकाºयांने सांगितले.

Web Title:  The National Park on the east, due to the overwhelm, 50 large trees in the garden collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.