१ ऑक्टोबरपासून नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 01:47 AM2020-09-30T01:47:26+5:302020-09-30T01:47:54+5:30

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सकाळी ५.३० ते ८.३० यावेळेत १ आॅक्टोबरपासून मॉर्निंग वॉकसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

National Park to open for Morning Walk from October 1? | १ ऑक्टोबरपासून नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार ?

१ ऑक्टोबरपासून नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले होणार ?

Next

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेले बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आता
१ आॅक्टोबरपासून कदाचित मॉर्निंग वॉकर्ससाठी खुले होण्याची शक्यता आहे. उद्यान प्रशासनाकडून याबाबत चर्चा सुरू असून, अद्याप याबाबत लेखी आदेश काढण्यात आलेले नाहीत.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सकाळी ५.३० ते ८.३० यावेळेत १ आॅक्टोबरपासून मॉर्निंग वॉकसाठी खुले होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. लेखी आदेश काढण्यात आले की, याची अंमलबजावणी केली जाईल. उद्यान सुरुवातीला केवळ मॉर्निंग वॉकसाठी खुले केले जाईल. त्यानंतर सुरुवातीचे पंधरा दिवस येथील परिस्थिती पाहिली जाईल.
जर का परिस्थिती योग्य असेल तर कदाचित उद्यान पूर्ण वेळ खुले करण्याबाबत सविस्तर विचार केला जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि अशा वेळी येथील हेच उद्यान नागरिकांसाठी खुले करणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे.

च्संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे फुप्फुस म्हणून ओळखले जाते.
च्येथे सकाळी व्यायाम करण्यासह जॉगिंगसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
च्विशेषत: स्थानिकांचा यात मोठा समावेश आहे.
च्मात्र लॉकडाऊनमुळे हे उद्यान बंद आहे.
च्पुन:श्च हरिओमअंतर्गत सरकारने सामाजिक अंतर पाळत सकाळी मॉर्निंग वॉकसह व्यायामाची परवानगी दिली आहे.
च्मात्र बोरीवली येथील हे उद्यान बंदच आहे. परिणामी स्थानिक नाराज आहेत.

च्संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास दिवसाला सरासरी ६ हजार जण भेट देतात.
च्यातील बहुतांश लोक हे घोळक्याने येतात.
च्अशा वेळी उद्यान सुरू करणे योग्य नाही.
च्हे उद्यान एखाद्या जंगलासारखे आहे.
च्गेल्या ६ महिन्यांतील लॉकडाऊनमुळे येथील शांतता वाढली आहे.
च्येथील वन्यजीवांना आता पूर्वीसारखी माणसांची सवय राहिली नसेल.
च्उद्यान जरी खुले केले तरी आता वाहनांना प्रवेश देऊ नये.

Web Title: National Park to open for Morning Walk from October 1?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.