नॅशनल पार्कमध्ये वाघ-सिंहांना मिळणार जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 04:49 AM2018-09-16T04:49:01+5:302018-09-16T04:49:37+5:30

पर्यटकांच्या तक्रारीनंतर निर्णय; उद्यान प्रशासनाने सफारीमध्ये प्राण्यांची संख्या वाढवली

In the National Park, tigers and lions will get the partners | नॅशनल पार्कमध्ये वाघ-सिंहांना मिळणार जोडीदार

नॅशनल पार्कमध्ये वाघ-सिंहांना मिळणार जोडीदार

Next

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र व सिंह सफारी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू मानले जाते. परंतु येथे वाघ आणि सिंहाची संख्या सफारीमध्ये कमी असल्याने पर्यटकांच्या तक्रारी वनविभागाकडे येत होत्या. पिंजऱ्यामध्ये एक प्राणी ठेवण्यात आला असेल तर तो एखाद्या कोपºयात किंवा आडोशाला जाऊन बसला तर पर्यटकांना त्याचे दर्शन होत नव्हते. त्यामुळे सफारीसाठी दिलेले पैसे वाया गेल्यासारखे पर्यटकांना वाटायचे. पर्यटकांनी तक्रार केल्यानंतर वाघ आणि सिंहाची नर-मादी अशी जोडी एकत्र व्याघ्र व सिंह सफारीमध्ये ठेवण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे म्हणाले की, व्याघ्र व सिंह सफारीमध्ये एकच प्राणी दिसतो किंवा काही वेळा दिसत नसल्याने पर्यटकांच्या तक्रारी येत होत्या. दोन नर आणि दोन मादी एकत्र ठेवल्या तर त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे नर-मादीची जोडी एकत्र ठेवण्यात आली आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार वन्य प्राण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मुळात नॅशनल पार्कची व्याघ्र व सिंह सफारीची पद्धत चुकीची आहे. प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडून तेथे पर्यटकांना घेऊन जाऊन प्राणी दाखविण्यात आले पाहिजे. मात्र नॅशनल पार्कात चारही बाजूने बंदिस्त असलेल्या पिंजºयामध्ये असलेल्या वाघ, सिंह आणि बिबटे पर्यटकांना दाखविले जातात. तर याला व्याघ्र व सिंह सफारी असे म्हणता येणार नाही. ताडोबाच्या जंगलामध्ये वन्यप्राणी मुक्त संचार करतात आणि तेथे पर्यटकांना नेऊन वन्यप्राणी बघण्याचा आनंद ते घेत असतात, अशी मते प्राणिमित्रांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

आता पिंजऱ्यात दोन प्राणी
वाढत्या संख्येच्या माहितीनुसार, सुरुवातीला एका पिंजºयात एक प्राणी म्हणजे एक सिंह नर ठेवला जात होता. मात्र आता एका पिंचºयात एक सिंह नर आणि एक सिंह मादी अशी जोडी पर्यटकांना पाहता येणार आहे. दरम्यान, सफारीतील वाघ आणि सिंहांना पावसाळ्यात मुक्त संचारासाठी सोडले जात नाही. कारण या काळात झुडपांची संख्या वाढते. मात्र, पावसाळ्यानंतर झुडपांची संख्या कमी झाल्यावर वन्यप्राण्यांना मुक्त संचार करण्यास सोडले जाते.

Web Title: In the National Park, tigers and lions will get the partners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ