मुंबइ : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेले बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आता १ ऑक्टोबरपासून कदाचित मॉर्निग वॉकर्ससाठी खुले होण्याची शक्यता आहे. उद्यान प्रशासनाकडून याबाबत चर्चा सुरु असून, अद्याप याबाबत लेखी आदेश काढण्यात आलेले नाहीत.
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सकाळी ५.३० ते ८.३० यावेळेत १ ऑक्टोबरपासून मॉर्निग वॉकसाठी खुले होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरु आहे. लेखी आदेश काढण्यात आले की याची अंमलबजावणी केली जाईल. उद्यान सुरुवातीला केवळ मॉर्निंग वॉकसाठी खुले केले जाईल. त्यानंतर सुरुवातीचे पंधरा दिवस येथील परिस्थिती पाहिली जाईल. जर का परिस्थिती योग्य असेल तर कदाचित उद्यान पुर्ण वेळ खुले करण्याबाबत सविस्तर विचार केला जाईल, असेही सुत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबईसह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात असतानाच आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली पश्चिमेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानदेखील खुले करण्यात यावे, अशा आशायाची मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे उत्तर मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आणि अशावेळी येथील हेच उद्यान नागरिकांसाठी खुले करणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला जात आहे.-----------------------
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते.- येथे सकाळी व्यायाम करण्यासह जॉगिंगसाठी येणा-यांची संख्या मोठी आहे.- विशेषत: स्थानिकांचा यात मोठा समावेश आहे.- मात्र लॉकडाऊनमुळे हे उद्यान बंद आहे.- मिशीन बिगीन अगेन अंतर्गत सरकारने सामाजिक अंतर पाळत सकाळी मॉर्निंग वॉकसह व्यायामची परवानगी दिली आहे.- मात्र बोरीवली येथील हे उद्यान बंदच आहे. परिणामी स्थानिक नाराज आहेत.-----------------------
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास दिवसाला सरासरी ६ हजार जण भेट देतात.- यातील बहुतांश लोक हे घोळक्याने येतात.- अशा वेळी उद्यान सुरु करणे योग्य नाही.- हे उद्यान एखाद्या जंगलासारखे आहे.