लोककलांवर राष्ट्रीय चर्चासत्र
By admin | Published: February 21, 2017 06:52 AM2017-02-21T06:52:23+5:302017-02-21T06:52:23+5:30
मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई विद्यापीठाचे शाहीर अमरशेख अध्यासन आणि लोककला
मुंबई : मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई विद्यापीठाचे शाहीर अमरशेख अध्यासन आणि लोककला अकादमीतर्फे शाहीर अमरशेख सभागृह, विद्यापीठ विद्यार्थी भवन चर्चगेट येथे लोकसाहित्य, लोककलांवर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
लोककलांचे लौकिकीकरण, जागतिकीकरण आणि लोककला या विषयांवर दोन चर्चासत्रे आयोजित केली आहेत. राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागाचे संचालक अजय आंबेकर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान असतील. चर्चासत्रात डॉ. मधुकर वाकोडे, प्रा. दत्ता भगत, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. रुस्तम अचलखांब, डॉ. हरीश्चंद्र थोरात, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, डॉ. प्रवीण भोळे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)