राष्ट्रीय मतदार दिन विशेष :मुंबईत पदवीधर मतदारांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:21 AM2018-01-25T02:21:55+5:302018-01-25T02:22:00+5:30

सुशिक्षित नागरिकांकडून मतदार नोंदणीकडे पाठ फिरवली जात असल्याने निवडणूक आयोगासमोर नोंदणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सर्वसामान्य मतदारांच्या नोंदणीची संख्या ९१ लाखांच्या घरात असतानाही, पदवीधर मतदारसंघासाठी होणाºया नोंदणीत हा आकडा ५९ हजार मतदारांपर्यंत खालावला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुशिक्षित पदवीधरांची नोंदणी कशी वाढवायची? असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा आहे.

National Voters Day Special: Depression of Graduate voters in Mumbai | राष्ट्रीय मतदार दिन विशेष :मुंबईत पदवीधर मतदारांची उदासीनता

राष्ट्रीय मतदार दिन विशेष :मुंबईत पदवीधर मतदारांची उदासीनता

Next

चेतन ननावरे 
मुंबई : सुशिक्षित नागरिकांकडून मतदार नोंदणीकडे पाठ फिरवली जात असल्याने निवडणूक आयोगासमोर नोंदणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सर्वसामान्य मतदारांच्या नोंदणीची संख्या ९१ लाखांच्या घरात असतानाही, पदवीधर मतदारसंघासाठी होणाºया नोंदणीत हा आकडा ५९ हजार मतदारांपर्यंत खालावला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुशिक्षित पदवीधरांची नोंदणी कशी वाढवायची? असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांना पाच वर्षांत महापालिका, विधानसभा आणि लोकसभा या अशा तीन निवडणुकांसाठी तीन वेळा मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मात्र, पदवी धारण केलेल्या मतदारांना या तीन निवडणुकांव्यतिरिक्त पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही मतदान करण्याचा एक जादा अधिकार मिळतो. तरीही उदासीन मनोवृत्ती असलेल्या पदवीधारकांकडून पदवीधर मतदार नोंदणीकडे पाठ फिरवल्याचे दिसते. त्यात निवडणूक आयोगाकडून इतर निवडणुकांच्या तुलनेत पदवीधर मतदार नोंदणीसाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याचा आरोप अपक्ष उमेदवार दीपक पवार यांनी केला आहे.
महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांत मतदार नोंदणीसाठी पोस्टर व पथनाट्यांसह रेडिओपासून टीव्हीपर्यंत, आॅनलाइनपासून प्रिंटपर्यंत प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाकडून मतदारांवर जाहिरातींचा भडीमार केला जातो. मात्र, पदवीधर मतदार नोंदणीसाठी असे कोणतेही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत, म्हणूनच सर्वसामान्य मतदारांच्या तुलनेत पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणीत आयोगाला अपयश मिळत असल्याचे दिसते.
पदवीधरांची एक टक्क्याहून कमी नोंदणी
सर्वसामान्य मतदारांचा आकडा ९० लाखांपलीकडे गेला असताना पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी केलेल्या पदवीधर मतदारांचा आकडा हा ६० हजारांहून कमी असल्याचे दिसते. परिणामी, सर्वसामान्य मतदारांच्या तुलनेत पदवीधर मतदारांची झालेली नोंदणी ही खूपच तोकडी वाटते. हा आकडा एकूण मतदारांच्या एक टक्क्याहून कमी आहे.
केवळ ५९ हजार ७९ पदवीधर मतदारांची नोंद -
सर्वसामान्य मतदार नोंदणीनुसार मुंबईत ५० लाख ६२ हजार ४८९ पुरूष आणि ४१ लाख ९० हजार १०९ महिला मतदार आहेत. तर मुंबईतील तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४२१ इतकी आहे.
जानेवारी महिन्यापर्यंत झालेल्या नोंदणीनुसार मुंबईत एकूण ९२ लाख ५३ हजार ०१९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीनुसार मुंबईत केवळ ५९ हजार ७९ पदवीधर मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: National Voters Day Special: Depression of Graduate voters in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.