मुंबई - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक प्रक्रियेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक भारतीयाल मतदानाचा अधिकार आहे. मतदान जनजागृतीसाठी 25 डिसेंबर हा दिवस देशात मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र, 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. त्यामुळे सन 2011 पासून देशभरात हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा होत आहे.
मतदारांमध्ये जनजागृती करणे, मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, नव मतदारांचे नोंदणीकरण करणे, मतदारांना प्रोत्साहन देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 25 डिसेंबर 2011 साली 'राष्ट्रीय मतदार दिवसाचा' शुभारंभ केला होता. निवडणूक आगोयाच्या 61 वर्षपूर्तीनिमित्त या दिवसापासून हा दिवस देशभरा साजरा करण्यास सुरूवात झाली.
मतदारांसाठी काही नियम व अधिकार
राज्यघटनेनुसार मतदारासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण करणे बंधनकारक. 28 मार्च 1989 पासून 18 वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मताधिकार मिळाला, त्यापूर्वी मतदारासाठी 21 वर्षे पूर्ण असण्याची अट होती. जी व्यक्ती भारताचा नागरिक नाही, ती व्यक्ती देशात मतदान करण्यास अपात्र आहे.अनिवासी भारतीयांना देशात मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. नियमानुसार एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारास नाव नोंदणी करता येत नाही.