राष्ट्रवादी, सेना, भाजपाचे उमेदवार कोटयाधिश

By Admin | Published: September 30, 2014 11:34 PM2014-09-30T23:34:09+5:302014-09-30T23:34:09+5:30

मतदारसंघातील प्रमुख पक्षाचे बहुंताश उमेदवार कोटयाधिश असुन अपक्ष उमेदवार ओमी कलानी यांची संपत्ती 37 कोटी आहे.

Nationalist, Army, BJP candidate, Kotayadish | राष्ट्रवादी, सेना, भाजपाचे उमेदवार कोटयाधिश

राष्ट्रवादी, सेना, भाजपाचे उमेदवार कोटयाधिश

googlenewsNext
>सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
मतदारसंघातील प्रमुख पक्षाचे बहुंताश उमेदवार कोटयाधिश असुन अपक्ष उमेदवार ओमी कलानी यांची संपत्ती 37 कोटी आहे.   भाजपाचे उमेदवार कुमार आयलानी यांची 9 कोटी तर ज्योती कलानी यांची 6 कोटीची संपत्ती दाखविली आहे.
उल्हासनगर मतदारसंघात 32 जण निवडणूक रिंगणात उतरले असून सर्वाधिक 37 कोटीची संपत्ती अपक्ष उमेदवार ओमी कलानी यांनी दाखविली आहे.  त्यांच्याकडे 25 गुंठे जमिन, 8 लाखाचे सोन्याचे दागिने, 5 लाखाची एलआयसी पॉलिसी, तसेच पोलिस संरक्षणापोटी 7 लाख 76 हजाराची थकबाकी दाखविली आहे. भाजपाचे कुमार आयलानी यांनी एकूण 9 कोटीची संपत्ती दाखविली असून दीड कोटीचे कर्ज दाखविले आहे.  त्याच्याकडे विविध कंपन्यांच्या  4 गाडया,  22 लाखाचे सोन्याचे दागिने, व जमिन दाखविली आहे.
संपत्तीच्या बाबतीत कुमार आयलानी यांना ओमी कलानी यांनी मागे टाकले असून राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी यांनी  6 कोटीची संपत्ती दाखविली आहे.  शिवसेनेचे उमेदवारी धनजंय बोडारे यांनी प}ीच्या संपत्तीसह 1 कोटी 15 लाखाची संपत्ती दाखविली आहे.  कॉग्रेसचे प्रकाश कुकरेजा व मनसेचे सचिन कदम यांनी प्रत्येकी 25 लाखाची संपत्ती दाखविली आहे.  
तर साई पक्षाचे जीवन इदनानी व  आशा इदनानी यांची संपत्ती कोटयावधी रूपये दाखविली आहे. बहुजन विकास आघाडीचे शेरी लुंड, अपक्ष उमेदवारी मनोज सयानी, हेही कोटयाधिश उमेदवार आहेत. (प्रतिनिधी)
 
4सर्वाधिक 37 कोटीची संपत्ती अपक्ष उमेदवार ओमी कलानी यांनी दाखविली आहे.  त्यांच्याकडे 25 गुंठे जमिन, 8 लाखाचे सोन्याचे दागिने, 5 लाखाची एलआयसी पॉलिसी, तसेच पोलिस संरक्षणापोटी 7 लाख 76 हजाराची थकबाकी दाखविली आहे.

Web Title: Nationalist, Army, BJP candidate, Kotayadish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.