मुंबई- महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस यांचे ईडी सरकार येऊन जवळपास २६ दिवस झाले. या २६ दिवसांदरम्यान राज्यात सुमारे ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे जवळपास साडे आठ लाख हेक्टरची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असूनही शिंदे सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचं महेश तपासे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
मागच्या सरकारने घेतलेले निर्णय, निधीचा केलेला वाटप आणि राबविलेल्या योजनांना फक्त स्थगिती देण्याचे काम शिंदे सरकारने केलेले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेली हानी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का? असा प्रश्न राज्यातील जनता विचारू लागली आहे, असंही महेश तपासे यावेळी म्हणाले.