Join us

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा

By admin | Published: November 01, 2015 12:55 AM

दिघा येथील अनधिकृत बांधकामाप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात ब्रिजेश मिश्रा यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते व त्यांचे भाऊ राजेश गवते यांच्याविरोधात

नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत बांधकामाप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात ब्रिजेश मिश्रा यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते व त्यांचे भाऊ राजेश गवते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. मोरेश्वर अपार्टमेंट व शिमग्या अपार्टमेंट या दोन अनधिकृत इमारतींप्रकरणी मिश्रा यांनी ही तक्रार केली आहे. या इमारतींचे भूखंड एमआयडीसीचे असून, त्याचे बनावट सातबारा तयार करून, ते स्वत:चे असल्याचे भासवण्यात आले. यानंतर बनावट सीसीच्या (बांधकाम परवाना) आधारे अनधिकृत इमारत उभारलेली आहे. या भूखंडाच्या संदर्भात ब्रिजेश मिश्रा यांनी एमआयडीसी प्रशासनाकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. त्यामध्ये या बाबी उघड झाल्याने मिश्रा यांनी दोघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे शुक्रवारी रात्री तक्रार केली आहे. याचिकेनुसार न्यायालयाने दिघा परिसरातील ९९ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झाल्यानंतर रहिवाशांकडून बिल्डर्सविरोधात पोलिसांकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत. यानुसार, दाखल झालेल्या तीन तक्रारींत १२ जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. चौथ्या तक्रारीनुसार नगरसेवक नवीन गवते व त्यांचे भाऊ, तसेच नगरसेविका दीपा गवते यांचे पती राजेश गवते यांच्या विरोधातच दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांचा शोध सुरू आहे.