Join us

गच्चीवरील रेस्टॉरंट्सला मिळाला महापालिकेचा हिरवा कंदील

By admin | Published: May 11, 2016 2:34 AM

भाजपाने फेटाळलेल्या गच्चीवरील रेस्टॉरंटच्या प्रस्तावाला विकास नियोजन आराखड्यातूनच हिरवा कंदील मिळाला आहे़ सुधारित आराखड्याच्या प्रारूपातच अशी शिफारस करण्यात

मुंबई : भाजपाने फेटाळलेल्या गच्चीवरील रेस्टॉरंटच्या प्रस्तावाला विकास नियोजन आराखड्यातूनच हिरवा कंदील मिळाला आहे़ सुधारित आराखड्याच्या प्रारूपातच अशी शिफारस करण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाची लाट पसरली आहे; तर भाजपामध्ये चिडचिड सुरू आहे़ त्यामुळे या शिफारशीवरून राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे़नाइट लाइफची संकल्पना मांडणारे शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांचे गच्चीवरील रेस्टॉरंटलाही समर्थन आहे़ मात्र मित्रपक्ष भाजपानेच विरोधी पक्षांना हाताशी धरून हा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत फेटाळला़ भाजपाच्या या खेळीमुळे शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली होती़ परंतु विकास नियोजन आराखड्यामुळे गच्चीवरील रेस्टॉरंट्सचा मार्ग आता मोकळा होणार आहे़ (प्रतिनिधी)>यासाठी हवे गच्चीवर रेस्टॉरंटमुंबईत आठशे ठिकाणी गच्चीवर रेस्टॉरंट चालविले जातात़ त्यांच्यावर पालिकेने अनेकवेळा कारवाई केली़ परंतु असे रेस्टॉरंट अनेक ठिकाणी सुरूच असून, यात पालिकेचा महसूल बुडतो आहे़ त्यामुळे गच्चीवर रेस्टॉरंंटला परवानगी देण्याची मागणी हॉटेलमालकांकडून पुढे आली होती़ या मागण्या मान्य करीत प्रशासनाने धोरण तयार केले़> वादळी चर्चेची शक्यतामुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याच्या आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नाला भाजपाने सुरुंग लावला़ त्यानंतर गच्चीवरील रेस्टॉरंटचा प्रस्तावही सुधार समितीमध्ये बारगळला़ त्याचवेळी भाजपाने रात्रबाजारपेठची आपली संकल्पना मंजूर करून शिवसेनेला दणका दिला़ त्यामुळे गच्चीवर रेस्टॉरंटची शिफारस विकास नियोजन आराखड्यातूनच करण्यात आल्याने यावर राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत़>मुंबईत गच्चीवरील रेस्टॉरंट बेकायदा पद्धतीने सुरू असल्याने ते अधिकृत करून पालिकेचा महसूल वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने २०१२मध्ये घेतला़ समाजवादी पक्षाचे फराहन आझमी यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी सुधार समितीपुढे पाठविण्यात आला़ युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफच्या प्रस्तावाला धरून असलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेचे समर्थन होते़ मात्र भाजपाने काँगेस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांच्या मदतीने सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळला होता़>व्यवसायिक इमारत व निवासी हॉटेलच्या गच्चीवर रेस्टॉरंट सुरू करण्याची मुभा विकास आराखड्यातून देण्यात आली आहे़ या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ ठेवण्याचे टेबल आणि प्रसाधनगृहाची सोय हॉटेलमालक करू शकतो़ मात्र हे रेस्टॉरंट तात्पुरते अथवा कायमस्वरूपी सुरू ठेवले तरी त्यात कोणत्याही प्रकारचे बांधकाम संबंधित मालकाला करता येणार नाही, असे आराखड्यातून स्पष्ट करण्यात आले आहे़