जीवनशैली विकारांकरिता निसर्गोपचार अत्यंत फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:20 AM2020-02-19T02:20:27+5:302020-02-19T02:20:31+5:30

तज्ज्ञांनी व्यक्त केले मत : निसर्गोपचार महोत्सव यशस्वी

Natural therapy is extremely beneficial for lifestyle disorders | जीवनशैली विकारांकरिता निसर्गोपचार अत्यंत फायदेशीर

जीवनशैली विकारांकरिता निसर्गोपचार अत्यंत फायदेशीर

googlenewsNext

मुंबई : इंडियन नॅचरोपॅथी अँड योग ग्रॅज्युएट्स मेडिकल असोसिएशन-महाराष्ट्रच्या वतीने नुकताच सांताक्रुझ येथील कलिना विद्यापीठाच्या फिरोजशाह मेहता भवन येथे निसर्गोपचार महोत्सव पार पडला. या माध्यमातून निसर्गोपचार आणि त्याची उपयुक्तता याविषयी जनजागृती करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष डॉ.अभिषेक देवीकर निसर्गोपचारांत औषध प्रणाली म्हणून समग्र दृष्टिकोन आणि एखाद्याच्या जीवनात होणारे बहुविध फायदे याबद्दल सांगितले. मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा इत्यादी जीवनशैली विकारांकरिता निसर्गोपचार अत्यंत फायदेशीर आहे आणि मुंबईकरांनी आरोग्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी, ज्येष्ठ मानववंश शास्त्रज्ञ आर. के. मुतटकर, इंडियन नॅचरोपॅथी अँड योग ग्रॅज्युएट मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सत्यलक्ष्मी, डॉ.अभिषेक देवीकर, डॉ.अमेय देवीकर या कार्यक्रमास उपस्थित होते. याखेरीज, राज्यभरातील निसर्गोपचार डॉक्टर उपस्थित होते. सर्व सेवा संघाचे गांधीवादी विचारसरणीचे जयंत दिवाण यांनी गांधीजींचे आरोग्याविषयीचे
विचार सांगितले. तसेच तरुणांनी सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी त्याचा कसा उपयोग केला पाहिजे, हेही आवर्जून नमूद केले. डॉ.सत्यलक्ष्मी म्हणाले की, गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात विविध आरोग्यविषयक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी निसर्गोपचार कसे वापरले, याची माहिती दिली. हवामानातील बदल हे अनैसर्गिक जीवनशैलीमुळे झाली आहे. सध्या लोकांच्या बहुतेक सवयी मानवजातीला भेडसावणाऱ्या अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहेत. या सोहळ्यात डॉ.रवींद्र निसाळ यांना निसर्गोपचार शाखेतील अविरत व अमूल्य योगदानासाठी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात
आले.
 

Web Title: Natural therapy is extremely beneficial for lifestyle disorders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई