निसर्ग जागृती व पर्यावरण मित्र पुरस्कार डॉ.महेंद्र घागरे यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 11:57 PM2020-08-30T23:57:36+5:302020-08-30T23:59:11+5:30

डॉ.महेंद्र घागरे यांनी गत अनेक वर्षात औषधी वृक्ष बीजवाटप तसेच चंदन रोप वाटप यामध्ये बहुमोल कार्य केले आहे.आजवर ५० लाखाहुन अधिक औषधी वनस्पतींचे बीजवाटप भारतातील बहुतेक राज्यांत त्यांनी केले आहे.

Nature Awareness and Environment Friends Award announced to Dr. Mahendra Ghagre | निसर्ग जागृती व पर्यावरण मित्र पुरस्कार डॉ.महेंद्र घागरे यांना जाहीर

निसर्ग जागृती व पर्यावरण मित्र पुरस्कार डॉ.महेंद्र घागरे यांना जाहीर

googlenewsNext

मुंबई - भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा निसर्ग जागृती पुरस्कार यंदा निसर्ग व वृक्षलागवड,औषधी बीजवाटप तसेच चंदन वृक्ष लागवड याबद्दल संपुर्ण देशभरात केलेल्या अतुलनिय कार्याबद्दल पुणे येथील हरित मित्र परिवाराचे अध्यक्ष मा.डॉ.महेंद्र घागरे यांना दिला जाणार आहे. 

डॉ.महेंद्र घागरे यांनी गत अनेक वर्षात औषधी वृक्ष बीजवाटप तसेच चंदन रोप वाटप यामध्ये बहुमोल कार्य केले आहे.आजवर ५० लाखाहुन अधिक औषधी वनस्पतींचे बीजवाटप भारतातील बहुतेक राज्यांत त्यांनी केले आहे.आणि आजही अव्याहतपणे त्यांचे वृक्ष संवर्धनाचे कार्य सुरु आहे. वृक्षसंवर्धावर संपूर्ण भारतभर विविध व्याख्याने मार्गदर्शनसत्रे शिबिरे व रोपवाटप बिजवाटप कार्यशाळा यामाध्यमातुन त्यांचे कार्य सुरु आहे.
१लाख ११ हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

तसेच पर्यावरण व जल व्यवस्थापन याबाबत विशेष कार्य करणारे मा.श्री मनोज वैद्य यांना पर्यावरण मित्र पुरस्कार जाहिर झाला आहे. वर्ष अखेरीस हे दोन्ही पुरस्कार मुंबई येथे देण्यात येतील.असे भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाँ आनंद राणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Nature Awareness and Environment Friends Award announced to Dr. Mahendra Ghagre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.