Join us

निसर्गप्रेमींनी प्राप्त करून दिले छोटा काश्मीरला पूर्वरूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 3:03 AM

गोरेगावच्या आरे कॉलनीमधील छोटा काश्मीर म्हणजे मुंबईकरांचे हक्काचे आणि अत्यंत जवळचे पर्यटनस्थळ.

मुंबई - गोरेगावच्या आरे कॉलनीमधील छोटा काश्मीर म्हणजे मुंबईकरांचे हक्काचे आणि अत्यंत जवळचे पर्यटनस्थळ. मात्र, येथे घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे काही वर्षांपासून येथे पर्यटकांनी फिरकणे बंद केले. याची दखल घेत काही पर्यावरणवादी संस्था आणि निसर्गप्रेमींनी छोटा काश्मीरचे रूपडे पालटून टाकले आहे. येथे पूर्वीसारखी स्वच्छता आणि हिरवळ निर्माण झाल्यामुळे विविध प्रजातींचे पक्षी व फुलपाखरांचा वावर वाढू लागला आहे.सध्या छोटा काश्मीर येथे दोन हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे, तसेच येथून आतापर्यंत १,२०० किलो कचरा गोळा करण्यात आला आहे.याबाबत मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, छोटा काश्मीरच्या परिसरात २५० नीम, ६०० अशोकाची झाडे लावण्यात आली आहे. परिसरात ५ हजार झाडे लावण्याचा आमचा मानस आहे. झाडांची संख्या वाढल्यामुळे विविध प्रजातींचे पक्षी व फुलपाखरे परिसरात वावरताना दिसून येतात. कचऱ्याचे नवीन चार डबे बसविण्यात आले आहेत. दोन सीसीटीव्ही कॅमेरेही लक्ष ठेवून असतात. महापालिकेचे सफाई कामगार दररोज साफसफाई करण्यासाठी येत आहेत. पोलीस दर अर्ध्या तासाने गस्त घालत असतात. त्यामुळे यापुढे छोटा काश्मीर परिसरात पुन्हा घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही.पर्यटकांना सेल्फी पॉइंटची भुरळयेथे पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होती. आता ती समस्यादेखील सोडविण्यात आली आहे. येथील शौचालयांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. काही ठिकाणी कुंपण करणे बाकी आहे. मदत मिळाली की, कुंपणाचे काम त्वरीत पूर्ण केले जाईल. पर्यटकांसाठी एक सेल्फी पॉइंटही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची गर्दी वाढू लागली आहे, असेही शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई