Join us

नाट्य परिषद : ...आणि निवडणुकीचे पडघम वाजू लागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 7:15 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यावर, खºया अर्थाने आता या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबईत प्रसाद कांबळी यांनी ‘आपलं पॅनल’ या नावाचे पॅनल उभे करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पॅनलचा प्रसार सुरू केला आहे.

- राज चिंचणकरमुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यावर, खºया अर्थाने आता या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबईत प्रसाद कांबळी यांनी ‘आपलं पॅनल’ या नावाचे पॅनल उभे करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पॅनलचा प्रसार सुरू केला आहे. तर नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी निवडणुकीच्या रिंगणातच नसल्याने, विरुद्ध पॅनलची सूत्रे दीपक करंजीकर यांच्या हाती असल्याची नाट्य वर्तुळात चर्चा आहे.४ मार्च रोजी होत असलेल्या या निवडणुकीसाठी मुंबई (जिल्हा) विभागात एकूण ११ जागा आहेत. त्यासाठी ३१ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर मुंबई (उपनगर) विभागात ५ जागांसाठी १० उमेदवारांमध्ये चुरस रंगणार आहे. प्रसाद कांबळी यांच्या मुंबई (जिल्हा) विभागाच्या पॅनलमध्ये त्यांच्यासह गिरीश ओक, भरत जाधव, रत्नकांत जगताप, सुकन्या कुलकर्णी-मोने, अनंत पणशीकर, राजन भिसे, मंगेश कदम, कौस्तुभ सावरकर, सुनील देवळेकर, दिनेश पेडणेकर, संतोष काणेकर यांची वर्णी लागली आहे. तर मुंबई (उपनगर) विभागासाठी ‘आपलं पॅनल’मध्ये शरद पोंक्षे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, मधुरा वेलणकर व अशोक नारकर यांचा समावेश आहे.दरम्यान, दीपक करंजीकर यांच्या पॅनलमध्ये त्यांच्यासह चारुशीला वाच्छानी, विजय गोखले, सविता मालपेकर, विजय कदम, दिलीप दळवी, सुशांत शेलार, अमोल कोल्हे, विजय सूर्यवंशी, शकुंतला नरे, विजय कदम, देवेंद्र यादव असल्याचे बोलले जात आहे. इतर काही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. यापैकी काही जण मिळून एखादे वेगळे पॅनल निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे.या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील एकूण १९ जिल्हे ठरविण्यात आले होते. त्यापैकी ठाणे, पुणे, बीड, नांदेड, जळगाव, लातूर, रत्नागिरी, नाशिक व उस्मानाबाद येथील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मुंबई (जिल्हा), मुंबई (उपनगर), नागपूर, अकोला, वाशीम, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर सांगली, बेळगाव या ठिकाणी आता प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. आतापर्यंत निवडणुकीसाठी टपालाद्वारे केले जाणारे मतदान नाट्य परिषदेच्या यंदाच्या घटना दुरुस्तीनुसार बाद करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना मतदानाची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. साहजिकच, या वेळी मतदानाचा टक्का वाढणार की घसरणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे.प्रत्येक घटकाला स्थान...चांगले काम करून दाखवण्याच्या मुद्द्यावर आम्ही समविचारी मित्र एकत्र आलो आहोत. रंगभूमीच्या प्रत्येक घटकाला आमच्या पॅनलमध्ये आम्ही स्थान दिले आहे. आपल्या माणसांचे हे ‘आपलं पॅनल’ आम्ही निवडणुकीसाठी उभे केले आहे.- प्रसाद कांबळी, आपलं पॅनल

टॅग्स :मराठीमहाराष्ट्र