मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची यशवंत नाट्य संकुलातील मतमोजणी संपायला रविवारची मध्यरात्र उलटून गेली. मतमोजणी पूर्ण झाली असली, तरी या निवडणुकीचा अधिकृत निकाल बुधवार, ७ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. साहजिकच, या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, यात कोण बाजी मारते याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे.‘मोहन जोशी पॅनल’, ‘आपलं पॅनल’, ‘नटराज पॅनल’ यांच्यासह काही अपक्ष उमेदवारांचे भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. दरम्यान, मतमोजणीनंतर सोशल मीडियावर ‘आपलं पॅनल’ जिंकल्याचा निकाल व्हायरल झाला ॅहोता. त्यामुळे अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. मात्र असे असले तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही.नाट्य परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाच निकाल अद्याप जाहीर करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय ७ मार्च रोजी नाट्य परिषद निवडणुकीचा जो निकाल आम्ही जाहीर करू तोच अधिकृत निकाल असेल, असेही त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.७ मार्चला निकाल७ मार्च रोजी संध्याकाळी या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होणार आहे. निकालातून एकूण चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर नाट्य परिषदेच्या आखाड्यात पुढचे नाट्य रंगणार आहे.
नाट्य परिषद निवडणूक; निकालाची उत्सुकता शिगेला, मतमोजणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 6:03 AM