राज्यभरात ९ हजार ९६७ रुग्णांना नवजीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 06:59 AM2018-11-17T06:59:59+5:302018-11-17T07:00:33+5:30

मुंबईतील अरुंद रस्ते, रेल्वे स्थानकांलगतचा परिसर या ठिकाणाहून बाइक अ‍ॅम्ब्युलन्ससाठी मोठ्या प्रमाणात

Navajivan 9 thousand 9 67 patients in the state | राज्यभरात ९ हजार ९६७ रुग्णांना नवजीवन

राज्यभरात ९ हजार ९६७ रुग्णांना नवजीवन

Next

स्नेहा मोरे 

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मुंबई आणि राज्याच्या अन्य काही जिल्ह्यांत गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात बाइक अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यात आली. १४ महिन्यांत राज्यभरातील पाच जिल्ह्यांमधील ३० बाइक अ‍ॅम्ब्युलन्सने जवळपास १० हजार रुग्णांना नवजीवन दिले आहे.

मुंबईतील अरुंद रस्ते, रेल्वे स्थानकांलगतचा परिसर या ठिकाणाहून बाइक अ‍ॅम्ब्युलन्ससाठी मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. ही मोफत सेवा असून १०८ या क्रमांकावर उपलब्ध आहे. डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणे अशक्य आहे त्या ठिकाणी या बाइक अ‍ॅम्ब्युलन्सने सहजरीत्या पोहोचणे शक्य आहे. याचा विचार करून राज्यातील मुंबई, पालघर, अमरावती, सोलापूर आणि गडचिरोली अशा दुर्गम भागांत ही सेवा देण्यात येत आहे. बाइकचे चालक हे स्वत: डॉक्टर असल्यामुळे रुग्णांवर लगेचच प्रथमोपचार करून प्लॅटिनम मिनिट्समध्ये उपचार देत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.

अपघात रुग्णसंख्या
वाहन अपघात ३८५
मारहाण २८
भाजलेले रुग्ण ११
हृदयविकार ८८
पडणे २४८
विषबाधा १३
प्रसूती १७३
वीज पडणे १२
मोठ्या दुर्घटना २४
अन्य वैद्यकीय ५,०१९
विविध जखमा ४४२
आत्महत्या ५
अन्य ३,५१९
एकूण ९,९६७

जिल्हा बाइक अ‍ॅम्बुलन्स संख्या
मुंबई १८
पालघर ५
अमरावती ५
जिल्हा बाइक अ‍ॅम्बुलन्स संख्या
सोलापूर १
गडचिरोली १
एकूण ३०

Web Title: Navajivan 9 thousand 9 67 patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.