Join us

नवलकरवाडी मार्केट समस्याग्रस्त, खड्डे व गटारातील पाण्याच्या समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:43 AM

जोगेश्वरी पूर्वेकडील रेल्वेस्थानकानजीकच्या नवलकरवाडी मार्केट गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. मार्केटची साफसफाई करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची सोय नाही.

सागर नेवरेकरमुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील रेल्वेस्थानकानजीकच्या नवलकरवाडी मार्केट गेली कित्येक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. मार्केटची साफसफाई करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची सोय नाही. पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. मार्केटमध्ये विजेची उपकरणे अस्तव्यस्त झाली असून, विजेचा शॉक लागून अपघात होण्याची शक्यता आहे. मार्केट परिसरातील टाइल्स व लाद्या तुटलेल्या आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डे व गटारातील पाण्याच्या समस्येमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत.नवलकरवाडी मार्केट हे महापालिकेच्या ताब्यात असून, मूलभूत सुविधांची गैरसोय आहे. मार्केटला ४६ वर्षे पूर्ण झाली असून, याकडे प्रशासन लक्ष देत नाही. भाजी मार्केट, मच्छी मार्केट, फळ मार्केट इत्यादी मार्केट असून, व्यापाºयांसाठी पाण्याची सोय नाही. पूर्वी पाण्याची जोडणी करण्यात आली होती; परंतु महापालिकेने दुरुस्तीसाठी पाण्याची जोडणी काढली. याला १२ वर्षे उलटून गेली तरी अजूनही पाणी व्यापाºयांना मिळालेले नाही. तसेच पालिकेकडून मार्केटचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; परंतु मार्केटच्या नूतनीकरणाचे काम झालेले नाही. मार्केटच्या शेडची दुरवस्था झाली असून, व्यापाºयांना उन्हाळ््यात आणि पावसाळ््यात त्रास होतो. ग्राहकांना चालण्यासाठी चांगला रस्ताही नाही. मार्केटच्या नूतनीकरणात नवलकरवाडी मार्केट असोसिएशन मदत करण्यास तयार आहे. रस्त्यावर पथदिव्यांची गैरसोय असल्याने परिसरात अंधार असतो. त्यामुळे व्यापारी पालिकेला सर्व प्रकारचे कर भरतो, तरीही प्रशासन सुविधा पुरवत नाही, अशी माहिती नवलकरवाडी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष असलान शेख यांनी दिली.दरम्यान, स्थानिक आमदार, सहायक आयुक्त, नगरसेवक यांना वारंवार समस्येबाबत पत्रव्यवहार करूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जोगेश्वरीमधील नवलकरवाडी मार्केट हे सर्वात मोठा बाजार आहे. मार्केटमध्ये २४० गाळे आहेत. मार्केटमध्ये सुविधा नसल्याकारणाने ग्राहक खरेदीसाठी अंधेरीला जातात. मार्केटमधील मूलभूत सुविधा त्वरित पूर्ण केल्या नाहीत, तर सर्व व्यापारी प्रशासनाविरुद्ध आंदोलन छेडतील, असा इशारा व्यापाºयांनी दिला आहे.