नवरात्रौत्सवाला स्पर्धेचे स्वरूप

By admin | Published: September 20, 2014 10:53 PM2014-09-20T22:53:46+5:302014-09-20T22:53:46+5:30

दहीहंडी, गणोशोत्सव या सणांप्रमाणोच आता नवरात्रौत्सवही ग्लॅमर आणि स्पर्धेच्या कार्यक्रमात खेचू लागला आहे.

Navaratritswala competition format | नवरात्रौत्सवाला स्पर्धेचे स्वरूप

नवरात्रौत्सवाला स्पर्धेचे स्वरूप

Next
अमूलकुमार जैन - बोर्ली-मांडला
दहीहंडी, गणोशोत्सव या सणांप्रमाणोच आता नवरात्रौत्सवही ग्लॅमर आणि स्पर्धेच्या कार्यक्रमात खेचू लागला आहे. देवीची उपासना करण्याबरोबरच रात्री खेळला जाणारा दांडीया आणि गरबा हा युवापिढीच्या आकर्षणाचा विषय ठरू लागला आहे. यासाठी विविध प्रकारची फॅशन बाजारात येत आहे. विविध रंगांच्या साडय़ा आणि ड्रेस मटेरियलही खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली असून, नऊ दिवस त्या- त्या रंगाच्या साडय़ा आणि ड्रेस मटेरियल चर्चेचा विषय ठरत आहे.
नवरात्रीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतशा नवरंगी साडय़ा व ड्रेस मटेरिअलच्या खरेदीसाठी महिला आणि युवतींची बाजारपेठेत गर्दी पाहावयास मिळत आहे. पूर्वी पितृपक्षात कपडे खरेदी करणो हे अशुभ मानले जायचे, मात्र आजकाल नवरंगाच्या मायाजालामुळे हा समजही मागे पडलेलाच दिसून येतो. कापड दुकानदारांनीही ही गरज ओळखून विविध प्रकारच्या साडय़ा विक्रीसाठी आणल्या आहेत. 25क् रुपयांपासून ते 12क्क् रुपयांर्पयत उपलब्ध होणा:या या साडय़ा टेरिकॉटपासून ते शिफॉन, कांजीवरम, पेशवाई, पैठणी आदी अनेक प्रकारच्या महागडय़ा साडय़ा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या साडय़ांची खरेदी जोरात असल्याचे विक्रेत्या नैना यांनी सांगितले. अनेक विक्रेत्यांनी नवरंगांचे पॅकेजही लागू केले असून, खरेदीदारांना भरभक्कम सूटही दिली जात आहे.
 
4पूर्वी दांडीयासाठी एखादाच ड्रेस घेतला जायचा. मात्र आजकाल नऊ दिवस नऊ प्रकारचे ड्रेस विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 
4कॉलेज, नोकरीच्या निमित्ताने कंपनीत पुरुषवर्गाला रंगाचे कॉम्बिनेशन आता सांभाळावे लागत आहे.

 

Web Title: Navaratritswala competition format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.