पाणीकपातीचे संकट नवी मुंबईकरांवर नाही

By admin | Published: June 30, 2014 12:24 AM2014-06-30T00:24:59+5:302014-06-30T00:24:59+5:30

मुंबईसह ठाणो व पुणो यासारख्या प्रमुख शहरांवर सध्या पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. त्या तुलनेत नवी मुंबईकर मात्र नशीबवान ठरले आहेत.

Navi Mumbai crores do not have water crisis | पाणीकपातीचे संकट नवी मुंबईकरांवर नाही

पाणीकपातीचे संकट नवी मुंबईकरांवर नाही

Next
>नवी मुंबई : मुंबईसह ठाणो व पुणो यासारख्या प्रमुख शहरांवर सध्या पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. त्या तुलनेत नवी मुंबईकर मात्र नशीबवान ठरले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणा:या मोरबेत पुढील चार महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तूर्तास नवी मुंबईकरांवर कुठलीही पाणीकपात लादली जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जून महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही. याचा परिणाम म्हणून राज्यात भीषण पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणो, पुणो आणि नाशिक या शहरांना पाणीपुरवठा करणा:या तलावांची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे या शहरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. याबाबतीत नवी मुंबईकर मात्र भाग्यशाली ठरले आहेत. पाण्याचा स्वतंत्र असा स्रोत मोरबेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना निर्माण झाला आहे. सध्या या धरणात पुढील चार महिने पुरेल इतका साठा असल्याने तूर्तास पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Navi Mumbai crores do not have water crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.