नवी मुंबई, मीरा-भाईंदर पालिका अमृत शहरे गटात चमकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 10:02 AM2023-06-06T10:02:26+5:302023-06-06T10:03:28+5:30

पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा ३.०’ पुरस्काराचे वितरण

navi mumbai mira bhayandar palika amrit cities shined in the group | नवी मुंबई, मीरा-भाईंदर पालिका अमृत शहरे गटात चमकल्या

नवी मुंबई, मीरा-भाईंदर पालिका अमृत शहरे गटात चमकल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगा, समुद्रकिनारे, पश्चिम घाट हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यस्तरावरील पुरस्कारांमध्ये अमृत शहरे गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई द्वितीय आणि पुणे महानगरपालिकेने तृतीय पुरस्कार पटकाविला. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा ३.०’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अमृत शहरे गटात मीरा भाईंदर, अहमदनगर  आणि पनवेल महानगरपालिकेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. 
यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त गटात सौरभ राव (पुणे),  राधाकृष्ण गमे (नाशिक) आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांनी गौरविण्यात आले. 

सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे), रुचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांनी गौरविण्यात आले.

 

Web Title: navi mumbai mira bhayandar palika amrit cities shined in the group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई