Join us  

नवी मुंबई, पनवेलमध्ये आज वीज नाही

By admin | Published: May 23, 2014 3:03 AM

पनवेल, वाशी व नेरूळ परिसरातील वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

नवी मुंबई : पनवेल, वाशी व नेरूळ परिसरातील वीजवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. वीजवाहिनीच्या दुरूस्तीमुळे तळोजा एमआयडीसीतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत बंद राहणार आहे. नेरूळ परिसरात शिरवणे गाव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसरात सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचारपर्यंत बंद राहणार आहे. नेरूळ सेक्टर ३६, ३८, ४०, ४२, ४६, ४६ए, ५०ई, ५४, ५६, ५८ व किल्ले गावठाण परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत बंद राहणार आहे. महापे व पावणे एमआयडीसीमध्येही १० ते १ वाजेपर्यंत वीज नसणार आहे. दिघा परिसरातील बिंदू माधव नगर, आंबेडकर नगर, गणेश नगर, साठे नगर, राम नगर, विष्णू नगर, गवतेवाडी, इलठाणपाडा व दिघा एमआयडीसीतही दुपारी ४ वाजेपर्यंत वीज नसणार आहे. तुर्भे नाका, रॅलीज इंडिया, वाशी सेक्टर ११, १२, १५, इएसआयसी व एमजीएम रूग्णालय परिसर व सेक्टर २६ परिसरात सकाळी साडेसात ते दुपारी साडेचारपर्यंत वीज जाणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील वीजपुरवठाही बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)