स्वच्छतेत नवी मुंबईचा तिसरा; तर मुंबईचा आठवा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:07 AM2020-01-01T05:07:11+5:302020-01-01T06:45:45+5:30
लीग २०२० च्या तिमाहीचे निकाल जाहीर
नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या लीगची सुरुवात यावर्षी करण्यात आली आहे. पहिल्या दोन तिमाहीचे निकाल मंगळवारी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले आहे. त्यात देशभरातील १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर इंदूर आहे. नाशिक सातव्या, मुंबई आठव्या , पुणे बाराव्या, पिंपरी चिंचवड चौदाव्या क्रमाकांवर आहे. देशभरातील चार हजारांहून अधिक शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. स्थानिक स्तरावर स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेच्या आधारावर लीगचे गुणांकन केले जात आहे.
पहिल्या तिमाहीत आठव्या क्रमाकांवर असलेल्या नवी मुंबईने दुसऱ्या तिमाहीत तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे. केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्वच्छता सर्वेक्षण लीग २०२० च्या पहिल्या दोन तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या तीन महिन्यांत करण्यात आलेल्या स्वच्छता उपाययोजनांच्या आधारे रॅकिंग देण्यात आले आहे. नागपूर शहर एप्रिल ते जून २०१९ या तिमाहीत ३० व्या क्रमांकावर होते, मात्र जुलै ते सप्टेंबर या दुसºया तिमाहीत झेप घेत नागपूर शहराने १५ क्रमांक मिळविला आहे.