Join us

नवी मुंबई ते मरिन ड्राइव्ह टप्प्यात येणार, पूर्व द्रुतगती ते मरिन ड्राइव्हदरम्यान ३.५ किमी भुयारी मार्ग बांधणार

By नारायण जाधव | Published: January 14, 2023 10:17 PM

Mumbai: प्रस्तावित सी-लिंकसह पूर्व द्रुतगती मार्गाद्वारे नवी मुंबई आणि मरिन ड्राइव्ह आता लवकरच टप्प्यात येणार आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई : प्रस्तावित सी-लिंकसह पूर्व द्रुतगती मार्गाद्वारे नवी मुंबई आणि मरिन ड्राइव्ह आता लवकरच टप्प्यात येणार आहे. एमएमआरडीएने उशिरा का होईना अखेर पूर्व द्रुतगती मार्गावरील ॲारेंट गेट ते मरिन ड्राइव्हपर्यंत भुयारी मार्ग बांधण्यासाठी १४ जानेवारी रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर निविदा मागविल्या आहेत. या कामावर ६,३२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ४८ महिने अर्थात चार वर्षांत ते पूर्ण करण्यात येणार आहे.फ्रीवे ते मरिन ड्राइव्ह दहा मिनिटांतसुमारे ३.५ किमीचा हा २ बाय २ मार्गिकांचा भुयारी मार्ग राहणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील ॲारेंज गेटच्या सरदार पटेल मार्गावरून मरिन ड्राइव्ह येथील कोस्टल रोडला तो जोडला जाणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांना प्रस्तावित न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंकसह विद्यमान पूर्व द्रुतगती फ्रीवेद्वारे थेट मरिन ड्राइव्ह येथे कमीतकमी वेळेत पाेहोचता येणार आहे. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह हे अंतर अवघ्या १० मिनिटांत गाठता येणार आहे.वेळेसह इंधनाची बचत अन् प्रदूषणातून मुक्तीमुंबई पोर्ट ट्रस्ट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, जीपीओ येथील वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ, इंधनासह आवाज, हवेच्या प्रदूषणापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.दोन्ही रेल्वे मार्गासह हेरिटेज इमारती ओलांडणारहार्बर, मध्य रेल्वे मार्गासह या परिसरातील शेकडो हेरिटेज इमारती ओलांडून हा मार्ग जाणार आहे. यात बाधितांचे प्रमाण कमीतकमी असावे, हेरिटेज इमारती वाचाव्यात याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.जपानच्या पॅडको कंपनीने केला अभ्यासहा भुयारी मार्ग दोन्ही रेल्वे मार्गांसह हेरिटेज इमारतींखालून जाणार आहे. यात बाधितांचे प्रमाण कमीतकमी असावे. महापालिका, शासकीय व निमशासकीय आस्थापना यांच्याशी समन्वय साधून तद्नंतर तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्यायांचा विचार करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमणे, कंत्राटदाराचा शोध घेणे यासाठी जपानच्या पॅडको कंपनीच्या ९ कोटी ९ लाख ७९ हजार रुपयांच्या निविदेस एमएमआरडीएने आपल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.

टॅग्स :मुंबईरस्ते वाहतूक