Join us

नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा नाहीच, अपील फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 6:49 AM

त्यानंतर राणा यांच्या वडिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना दंडाधिकाऱ्यांनी फरारी घोषित केले. याविरोधात राणांच्या वडिलांनी केलेले अपील सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले. अनेकवेळा समन्स बजावूनही राणा यांचे वडील हरभजन कुंडलेस न्यायालयात हजर न राहिल्याने दंडाधिकारी न्यायालयाने गेल्याच महिन्यात त्यांना फरारी म्हणून घोषित केले.

त्यानंतर राणा यांच्या वडिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्या. संतोष कुलकर्णी यांनी राणांच्या वडिलांचे अपील फेटाळले. 

टॅग्स :नवनीत कौर राणाअमरावतीन्यायालय