नवरात्र मंडळ परवानगी, अग्निशमन शुल्क माफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:24 PM2023-10-12T13:24:55+5:302023-10-12T13:25:51+5:30

पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्या, त्यांच्या कल्पना आणि त्यांच्या सूचना  नमूद करून घेतल्या आणि त्याप्रमाणे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश  दिले आहेत. 

Navratri board permission, fire fighting fee waived | नवरात्र मंडळ परवानगी, अग्निशमन शुल्क माफ!

नवरात्र मंडळ परवानगी, अग्निशमन शुल्क माफ!

मुंबई : यंदाच्या नवरात्रौत्सव व छटपूजेचे आयोजन व सर्व आवश्यक सुविधांचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. दरम्यान  बिगर व्यावसायिक नवरात्र मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय ही पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शिवाय यावर्षीपासून मंडळांना  नाममात्र अनामत रक्कम १०० रुपये आकारण्यात येणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला आहे.
पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ प्रतिनिधींच्या समस्या, त्यांच्या कल्पना आणि त्यांच्या सूचना  नमूद करून घेतल्या आणि त्याप्रमाणे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निर्देश  दिले आहेत. 

निर्भया पथक  कार्यान्वित राहणार 
महिलांच्या सुरक्षेची तसेच दागिन्यांच्या चोऱ्या होऊ नयेत, म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेऊन काळजी घेण्यात येणार आहे. शिवाय या काळात पोलिसांचे निर्भया पथक संपूर्णपणे कार्यान्वित केले जाणार आहे. 

नवरात्रीच्या काळात ही काळजी घ्या
- अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल नंबर देऊ नका! 
- अनोळखी व्यक्तीने दिलेले खाण्यापिण्याचे पदार्थ स्वीकारू नका! 
- संकटात १०० नंबर डायल करून, अथवा महिला हेल्पलाईन नंबर १०९१ डायल करून पोलिसांची मदत घ्या!
 

Web Title: Navratri board permission, fire fighting fee waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.