नवरात्र, दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार

By सचिन लुंगसे | Published: October 11, 2023 04:34 PM2023-10-11T16:34:18+5:302023-10-12T11:43:26+5:30

दरवर्षी नवरात्रोत्सव मुंबई शहरात सामुहिक उत्सव म्हणून साजरा केला जातो.

Navratri, Durga Puja Mandals will get electricity at domestic rates; Appeal to Boards to get official electricity connection | नवरात्र, दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार

नवरात्र, दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार

मुंबई : गणेशोत्सवानंतर आता मुंबापुरीला नवरात्र उत्सवाचे वेध लागले असून, नवरात्र उत्सव साज-या करणा-या सार्वजनिक मंडळांना वीज कंपन्यांकडून घरगुती दराने विजेचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे मंडळांनी गैरमार्गाने विजेचा पुरवठा घेण्यापेक्षा रितसर अर्ज करून वीज पुरवठा घ्यावा, असे आवाहन बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि महावितरणने केले आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सव मुंबई शहरात सामुहिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. उत्सवा दरम्यान प्रामुख्याने मंदिरात किंवा मंडपामध्ये देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. अदानी इलेक्ट्रिसिटी ही अर्ज प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत नवरात्र मंडपांसाठी अनुदानित निवासी दर देऊ करत आहे. नवरारात्र तसेच दुर्गापूजा मंडळे वीज जोडणीसाठी आवश्यक अर्ज सादर करण्याहेतू अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या www.adanielectricity.com या संकतेस्थळाला किंवा अन्य साहाय्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या नजीकच्या कार्यालयाला भेट देऊ शकतात.

नवरात्र / दुर्गापूजा मंडपांना तात्पुरती वीज जोडणी देण्याबाबत अदानी इलेक्ट्रिसिटीचे प्रवक्ते म्हणाले, संपूर्ण मुंबई शहर हे यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सज्ज असताना अखंडित वीज पुरवठ्याची निकड आम्ही जाणून आहोत. गेल्या वर्षी आम्ही संपूर्ण मुंबईतील ५६८ हून अधिक नवरात्र मंडपांना अखंड वीज पुरवठा करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वीज जोडणी अत्यंत जलदपणे पुरविण्यासाठी आणि वीज पुरवठ्याची विश्वासार्हता राखण्यासाठी आमच्या परिचलन पथकाने यंदाही पूर्ण तयारी केली आहे. दुर्गापूजा मंडळांकडून अर्ज प्राप्त होण्याच्या ४८ तासात वीज पुरवठा सुरळीत होईल, याची आमचा चमू खात्री करत आहे.

दुर्गापूजा मंडपाला भेट देणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी अधिकृत परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडूनच वीज जोडणीचे काम करून घ्यावे.

हे करा

- मंडपस्थळी वीज जोडणीची तयारी ठेवा. केवळ अधिकृत व्यक्तींनाच मीटर केबिनमध्ये प्रवेशाची परवानगी द्या. वीज जोडणीसाठी मानक असलेल्याच वायर व स्विचचा वापरा करा.
- कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सिंगल आयसोलेशन पॉइंट असायला ठेवा.
- दर्जात्मक इन्सुलेशन टेपसह वायरचे टॅपिंग योग्यरित्या करा. मीटर केबिनमध्ये आणि स्विच कनेक्शनपर्यंत योग्य प्रवेश सुविधा ठेवा.
- देऊ केलेल्या मंजूर भारापेक्षा अधिक वीजभार नसावा.
- मंजुरी भारानुसार मानक क्षमता असलेल्या वायर, एमसीबी, आरसीसीबीचा वापर करा.
- बॅकअपसाठी जनरेटर वापरत असल्यास जनरेटर यंत्र आणि न्यूट्रल यांचे योग्यरित्या अर्थिंग करा.
- वीज जोडणी विस्तारासाठी तीन-पिन प्लग वापरा.
- परिचलनाच्या सविस्तर माहितीसह अग्निशामक यंत्र हे मीटर केबिनजवळ ठेवावे.
- मीटर केबिनजवळ धोक्याचा फलक प्रदर्शित करा.
- मीटर केबिनमध्ये योग्य अर्थिंग ठेवा.

हे करू नका

- वीज पुरवठ्याची अनधिकृत विस्तार जोडणी / थेट पुरवठा घेऊ नका.
- वायरिंगमधील सांधे शक्यतो टाळा.
- मीटर केबिनच्या प्रवेशामध्ये अडथळे ठेवू नका.
- मंजूर भाराची मर्यादा ओलांडू नका.
- फ्लड लाइट्स, पेडेस्टल फॅन, इन्सुलेटेड जॉइंट हे प्रवेशकर्त्यांच्या मार्गात ठेवू नका.
- मीटर केबिनमध्ये आणि परिसरात धोकादायक साहित्य टाळा.

Web Title: Navratri, Durga Puja Mandals will get electricity at domestic rates; Appeal to Boards to get official electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.