Navratri : गिरगावची गावदेवी, सप्तमातृकांतील लीलावती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:11 AM2019-10-03T00:11:04+5:302019-10-03T00:11:21+5:30
गिरीगाव म्हणून पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या गिरगावच्या वायव्येस गावदेवी लीलावती वास्तव्य करून आहे.
- राज चिंचणकर
मुंबई : गिरीगाव म्हणून पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या गिरगावच्या वायव्येस गावदेवी लीलावती वास्तव्य करून आहे. सध्या गावदेवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवीचे मूळ नाव लीलावती! २०० वर्षांपूर्वी ही देवी वाळकेश्वराच्या डोंगरात होती, असे सांगितले जाते. गावदेवीच्या नावावरूनच गिरगावच्या पायथ्याच्या या परिसराला गावदेवी असे नाव प्राप्त झाले आहे.
गावदेवी लीलावती ही सप्तमातृकांमधील एक म्हणून ओळखली जाते. या मंदिरात तिच्यासह शीतलादेवी आणि गणपतीची मूर्ती स्थानापन्न आहे. गावदेवीची मूर्ती म्हणजे एक प्रशस्त तांदळा असून, त्यावर शेंदुराचे लेपन केलेले आहे.
सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीचे बापाजी म्हात्रे यांनी गिरगावातील एका मोकळ्या जागी आणले आणि तिथे एक वडाचे झाड लावले.
सन १८०६ मध्ये बाळाजी भिकाजी यांनी येथे घुमटी बांधली. सन १८८६ मध्ये नवीन मंदिर बांधण्यात आले. सन १९६१ मध्ये जीर्णोद्धार करून गावदेवीचे सध्याचे मंदिर उभारण्यात आले.
गावदेवी मंदिराच्या आवारात पूर्वी पुष्करणी होती; परंतु आता ती बुजविण्यात आली आहे. या आवारात नर्मदेश्वराचेही मंदिर असून, येथे दीपमाळाही आहेत. सोमवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज पुरातन काळापासून गावदेवीची भक्तीभावाने पूजा-अर्चा करीत आला आहे.