नवरात्रीची सुरुवात आश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. प्रतिपदेला जरी घट बसत असले (देवीला बसवले)े तरी मुख्य घटस्थापना ( देवीने चंद व मुंड ह्यांचा वध केल्यानंतरचा मुहूर्त हा सप्तमी व अष्टमी ह्यामधील काळ असल्याने) सप्तमीच्या शेवटी करतात. विशेष करून बंगाल, ओरिसा तसेच पूर्व भारतात ही पद्धत दिसून येते. ज्याप्रमाणे गणपतीला २१ पत्री वाहिल्या जातात, त्याचप्रमाणे दुर्गामातेला ‘नवपत्री’ नऊ पत्री पूजनात ठेवल्या जातात. नव म्हणजे नऊ तसेच पत्री हा संस्कृत शब्द ‘वनस्पतींच्या पानांचा’आहे. महासप्तमीच्या दिवशी ह्या नऊ पत्री दुर्गेच्या मंडपात समारंभपूर्वक आणण्याची प्रथा आहे. ह्या नऊ पत्रींना पांढऱ्याशुभ्र व ज्याला लाल रंगाची काठ आहे अशा साडीमध्ये गुंडाळल्या जातात व मंडपात पूजेला ठेवल्या जातात. ह्या नऊ पत्री म्हणजे दुर्गेची नऊ रूपे असून, त्यांचा शरद ऋतूतील आरोग्याशी संबंध आहे. म्हणजेच दुर्गामाता आपल्यासोबत ‘आरोग्याचं वाण’ घेऊन येते.ही पूजा घटस्थापनेतील एक पूजन असून, नदीवर शुद्ध जलामध्ये ह्या पत्री धुवून साडीला हळद आणि कुंकू लावून दुर्गेच्या बाजूला ठेवल्या जातात. नऊ पत्री विशेष असून, स्त्री आरोग्य आणि शरद ऋतूतील आरोग्य त्यामध्ये दडलेले आहे. ह्या पत्री घरातील दैनंदिन उपयोगासाठी वापरण्याचे संकेत या प्रथेतून दिले आहे. नऊ पत्री दसºयापासून घरात राहून त्या घरातील स्त्रीचे संरक्षण करतात. नवरात्रीची ही नवदेवीची रूपे म्हणजे आरोग्याचे आशीर्वाद. पुरण काळी ह्या नऊ पानांना निसर्गमातेची प्रतीके म्हणून पूजले जात असे ,परंतु मां दुर्गेच्या पूजनात धर्मशास्त्रकारांनी त्यांना आणून आरोग्य संवर्धन केलेले दिसते.नवरात्रीमध्ये आणखी दोन फुलांना महत्त्व आहे, ते म्हणजे कमळ आणि पारिजातक. अष्टमी व नवमीमधील परिवर्तनाच्या ४५ मिनिटांच्या काळात मा दुर्गा चामुंडा देवीचे रूप धारण करते. हा काळ चंदा आणि मुंडो ह्या राक्षसांचा उद्याचा अंत समजला जातो आणि ह्या काळात १०८ कमळपुष्प देवीला वाहतात. कमळ हे पवित्र असून, चिखलात राहूनही स्वत: वेगळे राहते. म्हणजे कुठेच ते समर्पण करीत नाही तसेच थंड असून, वृद्धीसाठी गुणकारी मानतात. कमळ हे स्त्रियांच्या अनेक विकारांवर आयुर्वेद शास्त्राने औषधात वापरले आहे. चिखलात राहून आपले सौंदर्य ठेवणारे आणि वर येताना अस्वच्छ न येता सुंदर होऊन येते. समुद्रमंथनातून पारिजातक निर्माण झाला असून, त्याला भगवान कृष्णाने युद्धाने जिंकले आहे. पारिजातकाची फुले ही रात्री बहरतात आणि सकाळी पडतात. ती पूजेला वापरण्यासाठी म्हणूनच त्यांना अश्रू असे म्हणतात. पारिजातक उष्णतेवर अत्यंत गुणकारी असून, कर्करोगामध्ये होणाºया उष्णतेच्या त्रासावरील उत्तम औषध आहे. तोंड येण्यावर दोन पारिजातकाची पानेही बरे करतात. पारिजातक प्रतिकारक्षमता वाढविणारे असून, शरद ऋतूतील त्रासावरील उत्तर आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या वेळेस बहरतात. नवरात्री म्हणजे धार्मिक उत्सव, निसर्ग देवतेला उत्तम पीक मिळण्यासाठी दिलेली हाक.केळ्याचे खोंड केळीच्या पानांसह : - हे पानासह असलेले खोंड @ब्राहमानी # या देवीच्या रूपाचे प्रतीक मानतात. शरद ऋतूमध्ये तीव्र उन्हामुळे होणाºया अनेक विकारांवर केळीची पाने तसेच केळफुलाची भाजी हे उत्तम औषध आहे. केळी थंड असून, शरीरामध्ये पाणी ठेवण्यास मदत करतात. केळी तत्काळ शक्ती देणारी असून, शरीरातील वात कमी करण्यास मदत करतात. वर्षा ऋतूमुळे वाढलेला वात, कमी झालेला अग्नी तसेच शरीरात आलेला क्लेद (चिखल) यावर उत्तम औषध ठरते.बिल्व पत्र ( ) - ही पाने भगवान गणेशाच्या पत्रीमध्येही आढळतात. परंतु शरद ऋतूतील उष्णतेमुळे होणाºया पोटाच्या आजारांवरही गुणकारी ठरतात. हे पत्र भगवान शंकराचे प्रतीक संबोधतात. बिल्व पत्र पावसाळ्यामुळे होणाºया पोटाच्या अशक्तपणावर अत्यंत गुणकारी ठरणारी आहेत. बिल्व पत्र पाणी धरून ठेवतात, मलाला बांधतात, पोटातील आतड्यांना बळ देतात व येणाºया थंडीमध्ये अग्नी उत्तम राहण्यासाठी मदत करतात.दाडिम पत्र ( ) - ही पत्रीसुद्धा गणेशपत्रीत आढळते. देवीच्या रक्तदंतिका ह्या रूपाचे ते प्रतीक आहे. शरद ऋतूतील उन्हाळ्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तत्काळ शक्ती देणारी आहेत. शरद ऋतूमध्ये लहान मुले तसेच गर्भिर्णी स्त्रिया, नाजूक व्यक्तींना उन्हामुळे पोटाचे त्रास संभवतात. लहान बाळानाही जुलाबाचे त्रास होतात, ह्यावर दाडिम पत्र हे गुणकारी आहे. दाडिम रक्तप्रसाधन म्हणजेच रक्त शुद्ध करून कार्यशक्ती वाढवणारी आहे.तांदूळ ( )- ह्याची पाने ही लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात. तांदूळ म्हटले की, अक्षता आठवतात, कोकण आठवतो आणि एकाने काढलेले तांदळाचे केवळ भारतातील ७५० तांदळाच्या प्रजाती आठवतात. तांदूळ वृद्धी करणारा, थंड असून तत्काळ शक्ती देणारा आहे. तांदूळ सातवा गुण संपन्न असून, गर्भाशय व रक्ताचे प्रसादान करणारा आहे. शरद ऋतूतील उष्णतेवरील विविध विकारांवर तांदूळ हा अत्यंत गुणकारी आहारीय औषध आहे. तांदळाला लक्ष्मी म्हटले आहे, ह्यात सर्व काही दडले आहे.कचू अर्थात अळू ( )- अळू हे ‘चामुंडा’ देवीचे प्रतीक मानले जाते. अळूचा वापर शरद ऋतूतील उष्णतेवर उत्तम होतो. शरीरातील अंतर्गत रक्तस्त्राव थांबविण्याची क्षमता अळूमध्ये आहे. ह्याचा रस उष्णतेमुळे होणाºया जुलाबावर उपयुक्त आहे, तर अळू हे उत्तम शक्ती देणारे तसेच उत्तेजक, भूक वाढविणारे आहे. मूळव्याधीवर गुणकारी तसेच पावसाळ्यानंतर अनेक विषारी किड्यांच्या विषावरील औषध ठरते. अळू शक्ती देणारे आणि बहुदा अळू खायला पावसाळ्यानंतर सुरुवात करण्याचे प्रतीकही असावे.अशोक पत्र ( ) - ही पाने देवी शोकरहिता ह्या दुर्गेच्या रूपाचे प्रतीक मानले आहे. अशोक पत्र हे विशेषत: स्त्रियांच्या गर्भाशयावर कार्य करणारे आहे. शारदेतील उष्णतेचा त्रास हा गर्भाशयाला होऊन त्याचे विपरीत परिणाम स्त्रियांच्या प्रजोत्पादक अवयवावर होऊ नये ह्यासाठी अशोक प्रसिद्ध आहे.कचवीचे पान ( ) ही पाने गारवा देणारी असून, ही नवदुर्गेतील कालिका देवीचे प्रतीक मानली जातात. कचवी भूक वाढविणारी, वात कमी करणारी, उष्णतेच्या विकारांवर गुणकारी ठरतात. केश्य गणातील एक असून, शरीर थंड ठेवणारी आहे.जयंती ( ) - हे पान कार्तिक देवीचे प्रतीक आहे. जयंतीचा वापर तसा महाराष्ट्रामध्ये शुद्ध उटणे, च्यवनप्राष आदींमध्ये करतात. जयंती बळ देणारी रसायन वनस्पती असून, शरीर सुदृढ करते, अग्नी वाढवते, मांसपेशी बळकट करते.हळदीचे पान : () - पावसाळ्यात हळदीची पाने अगदी हिरवीगार आणि सुंदर दिसतात. हळदीचे पान हे दुर्गा मातेचे प्रतीक आहे. हळद ही शरद ऋतूतील उष्णतेवरील सर्वोत्तम औषध आहे. त्वचेचे शरदाच्या उष्णतेने होणारे विकार हळदीने नष्ट होताना दिसतात. शरदामधील उष्णतेने येणारे तोंड ह्यावर उत्तम उपाय आहेत. हळद रक्त प्रसारण करणारी असून, शरदात होणारी रक्त दुष्टी हळद कमी करते. हळद शरदातील उन्हाने जाणारे सौंदर्य मिळवून देते. हळद गर्भाशय आणि स्त्रियांच्या सर्वच अवयवांसाठी अत्यंत गुणकारी आहे.
Navratri : नवपत्री म्हणजे आरोग्य कवच!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 2:24 AM