Join us

नौदलाने थांबविली शोधमोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:07 AM

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने समुद्रात बुडालेल्या पी-३०५ आणि वरप्रदा बोटीसह बेपत्ता कर्मचाऱ्यांसाठी भारतीय नौदलाने आठवडाभरापासून चालविलेले शोध आणि ...

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने समुद्रात बुडालेल्या पी-३०५ आणि वरप्रदा बोटीसह बेपत्ता कर्मचाऱ्यांसाठी भारतीय नौदलाने आठवडाभरापासून चालविलेले शोध आणि बचाव मोहीम सोमवारी सायंकाळी थांबविली. १८८ लोकांची सुखरूप सुटका करण्यासोबतच बेपत्ता असलेल्या ८६ कर्मचाऱ्यांपैकी ७० जणांचे मृतदेह नौदलाच्या पथकांनी किनाऱ्यावर आणण्याची कामगिरी बजावली.

चक्रीवादळाच्या तडाख्याने १७ मे रोजी पी-३०५ वरील २६१ आणि वरप्रदा बोटीवरील १३ असे एकूण २७४ जण समुद्रात अडकले होते. त्यापैकी १८८ जणांची सुखरूप सुटका आणि ७० मृतदेह पथकांना हाती लागले. याशिवाय, रायगड आणि गुजरातमधील वलसाडच्या किनाऱ्यावर प्रत्येकी आठ आठ मृतदेह स्थानिक प्रशासनाला सापडले. शिवाय, समुद्रात बुडालेल्या बार्ज ३०५ आणि वरप्रदा बोटही नौदलाच्या पथकांनी शोधल्या. सोमवारी नौदलाच्या विशेष पथकांनी समुद्राच्या तळाशी जाऊन बोटीची पाहणी केली. बोटीत कुणी कर्मचारी अडकला नसल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर नौदलाने शोध आणि बचाव कार्य थांबवत पुढील शोध तटरक्षक दलाकडे सोपविला आहे. आयएनएस सुभद्रा वगळता नौदलाच्या सर्व नौका अपघातस्थळावरून किनाऱ्यावर आल्या आहेत.