नौसैनिकाने आयएनएस ताबर जहाजावर घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:41 AM2018-02-11T02:41:20+5:302018-02-11T02:41:27+5:30
नौदल सैनिकाने जहाजावरच गळफास घेतल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सी.आर. नाईकलू असे त्यांचे नाव आहे. ते आयएनएस ताबर जहाजावर प्रमुख खलाशी म्हणून कार्यरत होते.
मुंबई : नौदल सैनिकाने जहाजावरच गळफास घेतल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सी.आर. नाईकलू असे त्यांचे नाव आहे. ते आयएनएस ताबर जहाजावर प्रमुख खलाशी म्हणून कार्यरत होते.
कुलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४च्या सुमारास नाईकलू नेवल डॉकयार्डच्या ‘आयएनएस ताबर’ या जहाजावरच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या सहकाºयाने त्यांना तत्काळ अश्विनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची वर्दी लागताच कुलाबा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
नाईकलू हे मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूबाबत नौदलाच्या अधिकाºयांकडून कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी दिली. त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. ही हत्या की आत्महत्या, याबाबतचे गूढ कायम आहे. जर त्यांनी आत्महत्या केली तर आत्महत्येमागे नेमके कोणते कारण होते, या प्रकरणाची नौदलाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी चौकशी समितीही नेमण्यात
आली आहे.