Devendra Fadnavis PC: नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:59 PM2021-11-09T12:59:50+5:302021-11-09T13:07:54+5:30

केवळ १ संपत्ती नव्हे तर अशा ५ मालमत्ता आहेत ज्यात अंडरवर्ल्डचा संबंध आहे. माझ्यासाठी सलीम जावेदचा सिनेमा नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते तपास यंत्रणांना देणार आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

Nawab Malik links with underworld; He purchased land from convicts of the case Devendra Fadnavis | Devendra Fadnavis PC: नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

Devendra Fadnavis PC: नवाब मलिकांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

Next

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन मंत्री नवाब मलिकांनी आरोपांचा धुरळा उडवला होता. NCB अधिकारी समीर वानखेडेंविरोधात मलिकांनी वेगवेगळे आरोप केले होते. त्याचसोबत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा दावा केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असा इशारा दिला होता. आज देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी नवाब मलिकांवर(Nawab Malik) अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा पुराव्यासह दावा केला.

पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? २००३ मध्ये नवाब मलिक मंत्री होते. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल त्यांनी केला.

तसेच केवळ १ संपत्ती नव्हे तर अशा ५ मालमत्ता आहेत ज्यात अंडरवर्ल्डचा संबंध आहे. माझ्यासाठी सलीम जावेदचा सिनेमा नाही. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते तपास यंत्रणांना देणार आहे. हे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहे. NCP मंत्री काय कांड करतात हे त्यांनाही माहिती कळू द्या असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. 

काय आहे प्रकरण?

सरदार शहा वली खान १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील हा आरोपी आहे. ज्याला सुप्रीम कोर्टानेही शिक्षा सुनावली आहे. सध्या हा जन्मठेपेच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे. मुंबई महापालिका, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याठिकाणी बॉम्ब ठेवण्यासाठी रेकी करण्यासाठी शाहवली खान होता. टायगर मेमनसोबत ज्या इमारतीत ही बैठक झाली त्या बैठकीला ते हजर होते. ज्या गाड्यांमध्ये आरडीएक्स भरले त्यात शाहवली खान होता.

दुसरा मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल ज्याला २००७ मध्ये पकडला होतं. सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड होता. हसीना पारकरला जेव्हा अटक झाली तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावानं संपत्ती जमा होत होती. जमिनीवर कब्जा करण्याचा जो धंदा चालत होता त्यात हसीना पारकरचा साथीदार सलीम पारकर होता. कुर्ला येथे गोवावाला कंपाऊंड एलबीएस रोडवर ही जमीन आहे. सलीम पटेल आणि शहा वली खान यांच्याकडून नवाब मलिकांच्या कुटुंबीयांना जमीन घेतली होती. फराज मलिक यांनी ही जमीन खरेदी केली होती. या दोघांनी सॉलिडस इन्वेस्टमेंट कंपनीला विकली होती. १ कोटी महिना या दराने ही जागा भाड्याने दिली आहे. २००५ ही जमीन खरेदी केली अवघ्या ३० लाखात ही जमीन खरेदी केली. बाजारभावापेक्षा कमी दरात ही जमीन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून घेतली. कवडीमोल दरात ही जमीन खरेदी करण्यामागे काय हेतू होता? असं फडणवीस यांनी विचारलं आहे.

Read in English

Web Title: Nawab Malik links with underworld; He purchased land from convicts of the case Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.