Petrol Diesel Price Cut: “भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 06:18 PM2021-11-04T18:18:57+5:302021-11-04T18:21:08+5:30

Petrol Diesel Price Cut: ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा, अशी टीका करण्यात आली आहे.

nawab malik says more times you defeat bjp price of petrol and diesel will be reduced more | Petrol Diesel Price Cut: “भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील”

Petrol Diesel Price Cut: “भाजपला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील”

Next

मुंबई: दिवाळीतील नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने देशवासीयांना दिवाळीचे बंपर गिफ्ट दिले आहे. पेट्रोलडिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे संतप्त झालेले देशवासीय आणि रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकरी यांना मोदी सरकारने एका अर्थाने मोठीच भेट दिली आहे. यातच आता विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपाला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, असे म्हटले आहे. 

भाजपाला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी होत राहणार. ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला. यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

देशभर भाजपचा पराभव करावा लागेल

केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पण ही दर कपात पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे फलित आहे. आता ५ रुपयांची पेट्रोल स्वस्त झाले आहे. पण ५० रुपयांनी स्वस्त करायचे असेल तर आपल्याला संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल आणि २०२४ साली ते नक्कीच होईल, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेल आज शंभरी पलीकडे आहे. तुम्ही खरेच मोठ्या मनाचे असता तर पेट्रोल-डिझेल २५ ते ३० रुपयांनी स्वस्त केले असते, असेही राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, देशात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे १०० रुपयांच्या वर गेले आहेत. त्यात आता केवळ ५ ते १० रुपयांची कपात करण्यात येत आहे. यामुळे देशवासीयांना काहीसा दिलासा मिळू शकेल. मात्र, यात आणखी कपात करणे आवश्यक आहे. तसेच केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: nawab malik says more times you defeat bjp price of petrol and diesel will be reduced more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.