Join us

Nawab Malik: फडणवीसांनी ६ जीबी काय, १०० जीबीचा डेटा दिला तरी सरकार स्थिर- नवाब मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 7:37 PM

Nawab Malik On Letter Bomb : देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आरोपावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Nawab Malik: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंगचे पुरावे आणि जवळपास ६ जीबीपर्यंतचा डेटा एका बंद लिफाफ्यात सादर केला आहे. फडणवीसांच्या आरोपावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "फडणवीसांकडे ६ जीबी काय, १०० जीबीचा डेटा असला तरी महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार स्थिर आहे. त्यांनी बेकायदेशीपणे फोन टॅपिंग केली आहे हेच सत्य आहे", असं नवाब मलिक म्हणाले आहेत. (Nawab Malik slams Devendra Fadnavis over Mumbai Police Transfer Racket Allegations)

आमदार फोडू शकले नाहीत म्हणून 'डेटा बॉम्ब'"भाजपानं ज्या पद्धतीनं कर्नाटक आणि मध्यप्रदेशात आमदार फोडून सत्ता मिळवली. तसाच प्रयत्न फडणवीस महाराष्ट्रात करत आहेत. पण इथं आमदार फोडता येत नसल्यानं अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन सरकार पाडण्याची वेगवेगळी षडयंत्र रचण्याचं काम ते करत आहेत", असा थेट आरोप नवाब मलिक यांनी फडणवीसांवर केला आहे. 

सर्व पुरावे बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिलेत, आता योग्य ती कारवाई होईल: देवेंद्र फडणवीस

अंबानी स्फोटक प्रकरणाच हाच मुख्य मुद्दा"अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं कुणी ठेवली? कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली गेली? आणि का ठेवली गेली? हाच खरा मुद्दा आहे. या मुख्य मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपचे लोक करत आहेत", असं नवाब मलिक म्हणाले. 

"महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट", नवाब मलिकांचा आरोप

फडणवीस खोटारडे"राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख क्वारंटाइन होते आणि ते कुणालाच भेटले नाहीत हेच सत्य आहे. पण विरोधी पक्षनेते फक्त पोलिसांच्या रेकॉर्डच्या आधारावर फक्त नियोजित कार्यक्रमाचा दाखला देत आहेत. त्याठिकाणी देशमुख होते किंवा नाही आणि ते कुणाला भेटले की नाही याबाबत फडणवीसांना स्वत:लाही खात्री नाही. ते खोटे आरोप करत आहेत", असं नवाब मलिक म्हणाले. 

"नमस्कार, मला क्षमा करा", फडणवीसांनी माफी मागून केली पत्रकार परिषदेची सुरुवात कारण... 

फडणवीसांनी गृह सचिवांना दिले पुरावेदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबाबतचे पुरावे सादर केले. एका बंद लिफाफ्यात सर्व पुरावे केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. ते याची पडताळणी करुन योग्य कारवाई करणार आहेत आणि तसं आश्वासन त्यांनी दिलं आहे, अशी माहिती आज गृहसचिवांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील केल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.  

टॅग्स :नवाब मलिकदेवेंद्र फडणवीसपरम बीर सिंगमुंबई पोलीसअनिल देशमुख