Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 04:18 PM2021-11-09T16:18:30+5:302021-11-09T16:19:42+5:30

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावत सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचे नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी म्हटले आहे. 

nawab malik son faraz malik replied and gave explanation over devendra fadnavis allegations | Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले... 

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिकांच्या मुलाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले... 

Next

मुंबई: भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा व्यवहार १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि समील पटेल यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचे पुरावेही देवेंद्र फडणवीस यांनी दाखवले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावत सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचे नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचे काम आरोप करणे आहे. ग्रीन झोनमध्ये हे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. ७० टक्क्यांचे आरक्षण नाही. तर ३० टक्क्यांचे आरक्षण आहे. जे अंडरवर्ल्डबाबत आरोप होतात ते चुकीचे आणि खोटे आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणा येतील, तपास करतील. त्यांना आम्ही सगळे पुरावे दाखवू, सगळी कागदपत्रे आणि व्यवहार कायदेशीर आहे, असे फराज मलिक यांनी म्हटले आहे. 

आमच्याकडे सगळे जुने पुरावे आहेत

देवेंद्र फडणवीस दावा करत आहेत की, ही जागा आम्ही सलीम पटेलकडून विकत घेतली. तर २००५ मध्ये ते इथे ४०० लोकांकडून भाडे वसूल करत होते. आमच्याकडे सगळे जुने पुरावे आहेत. सलीम पटेल हे आमचे त्या काळातील जागामालक होते. हे सगळे साल २००७ ला दोषी आढळून आले आहेत. शाह वली खान अंडरवर्ल्डसाठी काम करतो हे आम्हाला माहितीच नव्हते. त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. रेडी रेकनरच्या दराने ही जागा विकत घेतली. इथे तीनशे भाडेकरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहतात. काही घरे अनधिकृतही आहेत. पण आम्ही त्यांना त्रास देत नाहीत, असे फराज मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, गोवावाला कंपाऊंडमध्ये आम्ही किरायाने राहायला होतो. तेव्हा जागा मालकिनीने आम्हाला जमीन विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शाह वली खानचे वडील तिथे वॉचमन म्हणून काम पाहत होते. तिथे शाह वली खानचे एक घरही होते. त्याने तिथे ३०० मीटर जागेवर कब्जा केला होता. आम्हाला रजिस्ट्रीला गेल्यावर ही गोष्ट माहिती झाली. ती जागा घेण्यासाठी आम्ही शाह वली खानला पैसे दिले. कुठल्याही अंडरवर्ल्डच्या माणसाकडून आम्ही जमीन खरेदी केली नाही, असे सांगत नवाब मलिक यांनीही फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
 

Web Title: nawab malik son faraz malik replied and gave explanation over devendra fadnavis allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.