लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असणारे आ. नवाब मलिक यांना अजितदादा गटातून उमेदवारी देण्यास शिंदेसेना आणि भाजपने विरोध दर्शविला आहे. मात्र, त्यांची मुलगी सना मलिक यांना दादा गटाने अणुशक्ती नगरमधून उमेदवारी दिली आहे.
तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. अजितदादा यांनी शिंदे सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तुरुंगातून सुटलेल्या मलिक यांनी दादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. नवाब मलिक हे मानखुर्दमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही त्यांचे नाव नाही. मात्र, शुक्रवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे.