Join us

Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख, नवाब मलिकांचा पुन्हा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 8:13 PM

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Party) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू असलेली आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे.

मुंबई-

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Party) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू असलेली आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. आज नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला. समीर वानखेडे धर्माने मुस्लीम आहेत. पण त्यांनी ही बाब लपवून ठेवली असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तर समीर वानखेडेंनी मात्र आपण हिंदूच असल्याचा दावा केला होता. इतकंच नव्हे, तर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू महार असल्याचं कोर्टात म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांनी आज थेट समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखलाच सादर केला आहे. मलिकांनी सादर केलेल्या दोन्ही दाखल्यांमध्ये वानखेडे मुस्लिम असल्याचं नमूद केलं आहे. दोन्ही दाखल्यांमध्ये समीर दाऊन वानखेडे असं नाव लिहिल्याचं दिसून येत आहे. 

सचिन वाझे व परमबीर सिंह यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरु केला होता. अँटिलियासमोर बॉम्ब प्लाण्ट करुन जे काही केले ते सरकारला अंधारात ठेवून केले गेले. विधानसभेत जेव्हा प्रश्न आला तेव्हा देखील तत्कालिन मुंबई आयुक्तांनी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली

सगळी माहिती समोर आल्यानंतर आयुक्तांची बदली करण्यात आली. बदलीनंतर हे प्रकरण पुढे जाईल आणि तपास सुरु होईल हे कळल्यानंतर भाजपच्या मदतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली व काही लोकांनी सीबीआयमार्फत याचा एफआयआर दाखल करुन घेतला.

एफआयआर दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. आदरणीय शरद पवार साहेबांनी काल नागपूर येथे हे स्पष्ट केले की, तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या, जे काही तुम्ही करत आहात, त्याचे उत्तर आम्ही देऊ - 

अनिल देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला आहे. जो तक्रारदार आहे तोच आता फरार झालेला आहे, हे लोक पाहत आहेत. आज ना उद्या यातील सत्यता कोर्टाच्या समोर येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांनी व्यक्त केला आहे

समीर वानखेडे यांच्या विरोधातील आणखी काही पुरावे आज नवाब मलिकांनी सादर केले. आपण घटस्फोट दिलेली पत्नी आपल्याविरोधात उभी राहू शकते या भीतीपोटी वानखेडे यांनी तिच्या चुलत भावाला एका ड्रग पेडलरमार्फत अडकविले, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच वानखेडे यांच्या शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी त्याचा वाद झाल्यानंतर या अधिकाऱ्याच्या मुलालाही खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले, असा दावा मलिकांनी केला. वानखेडे यांच्या वडीलांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच ट्विट करण्यापासून रोखावे, अशीही मागणी कोर्टापुढे केली आहे.

टॅग्स :नवाब मलिकनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमीर वानखेडे