Nawab Malik : कुर्ल्यातला 'चरस मलिक' कोण? हाजी अराफत शेख उद्या जगाला सांगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 05:32 PM2021-11-10T17:32:30+5:302021-11-10T17:34:59+5:30

नोटीबंदीतील 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणात मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते

Nawab Malik : Who is the 'Charas Malik' of Kurla? Haji Arafat Sheikh will tell the world tomorrow on nawab malik | Nawab Malik : कुर्ल्यातला 'चरस मलिक' कोण? हाजी अराफत शेख उद्या जगाला सांगणार

Nawab Malik : कुर्ल्यातला 'चरस मलिक' कोण? हाजी अराफत शेख उद्या जगाला सांगणार

Next
ठळक मुद्देनवाब मलिक यांनी इम्रान आलमचे नाव घेतल्यामुळे हाजी अराफत शेख यांनी माध्यमांसमोर येऊन, आता अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत, हे सांगणार असल्याचं म्हटलंय

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात बनावट नोटांचा खेळ सुरू होता. साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्यानंतर हे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. मलिकांनी अनेकांची नावे घेतली, त्यामध्ये भाजपा नेते हाजी अराफत शेख यांचंही नाव घेण्यात आलं. (NCP Leader Nawab Malik hydrogen bomb on BJP leader Devendra Fadnavis Underworld connection)

नोटीबंदीतील 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणात मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते. इम्रान आलम शेख हा भाजप नेते हाजी अराफात शेख यांचा लहान भाऊ आहे. याप्रकरणी नवी मुंबईतही अटकेची कारवाई झाली. पण १४ कोटी ५६ लाख किमतीच्या बनावट नोटांचे हे प्रकरण ८ लाख ८० हजार रुपयांच्या बानावट असल्याचे दाखवून दाबले, असा आरोप मलिक यांनी केला. हे बनावट नोटांचे प्रकरण एनआयएकडे का सोपवले गेले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

नवाब मलिक यांनी इम्रान आलमचे नाव घेतल्यामुळे हाजी अराफत शेख यांनी माध्यमांसमोर येऊन, आता अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत, हे सांगणार असल्याचं म्हटलंय. एका शिवसेनेच्या बड्या नेत्यानं माझ्या जातीवर मला शिवी दिली होती, त्यामुळेच मी शिवसेना सोडल्याचं हाजी अराफत शेख यांनी सांगितलं. तसेच, अंडरवर्ल्डशी कोणाचे संबंध आहेत, हे मी उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. कोण कुठं-कुठं जमिनी खेरदी करतो, कोण वक्फ बोर्डाच्या जमिनी विकतो, कोण डेप्युटी सीईओच्या बदल्या करतो, हे सगळं आपण सांगणार आहोत, असे हाजी अराफत शेख यांनी म्हटलं. 

कुर्ल्याचा चरस मलिक कोण?

नवाब मलिक हे माझ्या भावाचा वाढदिवस साजरा करतात, भावाच्या घरी जातात, माझ्यापेक्षा माझ्या भावाशी त्यांचे जवळचे स्नेह संबंध आहेत. म्हणूनच, तो नवाब मलिकांच्या प्रत्येक कार्यक्रमात असतो, माझ्या भावाच्या मोबाईलचा डीपीही नवाब मलिकांचा आहे, असे हाजी अराफत शेख यांनी म्हटलं आहे. कुर्ला येथे चरस मलिक कुणाला म्हणतायं, याचाही खुलासा मी उद्या 5.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन करणार आहे, असेही हाजी अराफत शेख यांनी म्हटलं आहे.  
 

Web Title: Nawab Malik : Who is the 'Charas Malik' of Kurla? Haji Arafat Sheikh will tell the world tomorrow on nawab malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.