मलिक यांचे निकटवर्तीय लांबे यांचा दाऊदशी संबंध; देवेंद्र फडणवीस यांचा नवा बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:19 AM2022-03-15T07:19:06+5:302022-03-15T07:19:13+5:30

लांबेंची नियुक्ती सरकारने केली नाही; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

Nawab Malik's close relative Lambe's relationship with David; Devendra Fadnavis's new bomb | मलिक यांचे निकटवर्तीय लांबे यांचा दाऊदशी संबंध; देवेंद्र फडणवीस यांचा नवा बॉम्ब

मलिक यांचे निकटवर्तीय लांबे यांचा दाऊदशी संबंध; देवेंद्र फडणवीस यांचा नवा बॉम्ब

googlenewsNext

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे निकटवर्तीय डॉ. मुदस्सीर लांबे यांनी आपले दाऊदशी निकटचे संबंध असल्याचा दावा केला असून, लांबे व सध्या तुरुंगात असलेला महंमद अर्शद खान यांच्या संभाषणाचा पेनड्राइव्ह विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केला. वादग्रस्त डॉ. लांबे यांची वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी सरकारने नियुक्ती केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. 

दाऊदशी संबंधित माणसे  सरकार वक्फ बोर्डावर कसे नियुक्त करते, असा सवालही फडणवीस यांनी केला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मात्र डॉ. लांबे यांची नियुक्ती सरकारने केलेली नसून ते निवडून आल्याचे स्पष्ट केले. विधानसभा कामकाज नियम ५७ अन्वये अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत फडणवीस यांनी उपरोक्त आरोप केला. अल्पसंख्याक विभागासाठी अर्थसंकल्पात १,२९२ कोटी रुपयांची तरतूद केली असून, या रकमेचा नियतव्यय कोण करणार, असा सवाल फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, मलिक यांनी दाऊदच्या नातलगांकडून मालमत्ता खरेदी केली आहे. सध्या ते तुरुंगात असूनही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे.

मलिक यांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले डॉ. मुदस्सीर लांबे व महंमद अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा पेनड्राइव्ह आपण अध्यक्षांकडे सुपुर्द करीत आहोत. लांबे यांच्याविरुद्ध एका ३३ वर्षांच्या महिला सामाजिक कार्यकर्तीने ३१ डिसेंबर २०२० रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल केल्यावर लांबे यांनी तिच्यासोबत लग्नाची तयारी दाखवली. या महिलेला तिच्या पतीने घटस्फोट दिला.

लांबे यांनी तिच्या पतीविरुद्ध २८ जानेवारी २०२२ रोजी चोरीची तक्रार शीळ-डायघर पोलीस ठाण्यात दाखल केली. अशा वादग्रस्त व्यक्तीची सरकारने वक्फ बोर्डावर नियुक्ती केल्यावर ती व्यक्ती खान याच्यासोबत संवाद साधताना वक्फ बोर्डातून कमाई करण्याचे आपले मनसुबे जाहीर करीत आहे. लांबे आपले सासरे दाऊदचे उजवा हात असल्याचा दावा करीत आहेत, तर दाऊदचा निकटवर्तीय अन्वर हा आपला काका असल्याचे खान सांगत आहे. राज्यात ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. 

लांबे व महंमद खान यांच्या संवादातील अंश

डॉ. लांबे : मेरा प्रॉब्लेम क्या हैं मालूम... मेरे ससूर दाऊद कें राइट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपाने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दाऊद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है. 
अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.
डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.
अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.
डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.
अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेंशन है.
डॉ. लांबे : अर्शद मैं तो बोलता हू की, तुम अभी तुम 
अभी वक्फ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहें जितना पैसा कमा सकते हो. पुरे वक्फ के काम शुरू करो. कमाने का सेटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा
अर्शद खान : अभी मैं बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.
डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.
अर्शद खान : अर्शद के नाम सें बिल्डिंग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.
डॉ. लांबे : तुम्हारे उपर इन्क्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नहीं बैठ सकती.

Web Title: Nawab Malik's close relative Lambe's relationship with David; Devendra Fadnavis's new bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.