Join us

"सना तू घाबरु नको..."; नवाब मलिकांच्या कन्येस अजितदादांनी राष्ट्रवादीत दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:08 PM

Nawab Malik : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात जनसन्मान यात्रा सुरू आहे.

Ajit Pawar Nawab Malik ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात जनसन्मान यात्रा सुरू आहे. आज म्हणजेच सोमवारी १९ ऑगस्ट रोजी ही यात्रा मुंबईत होती. या यात्रेत माजी मंत्री आमदार नवाब मलिक उपस्थित होते, यामुळे आता मलिक यांचा पाठिंबा महायुतीला असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात राहणार यावर चर्चा झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहित मलिकांना सोबत घेण्यास विरोध केला होता. दरम्यान, आता आजच्या या यात्रेत अजित पवार यांनी नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारी दिली. 

"वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते"; नवाब मलिकांच्या मुलीने सगळंच सांगितलं

जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार यांनी सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रवक्ता असेल अशी घोषणा केली. अजित पवार म्हणाले, सना मलिक वडिलकीच्या नात्याने माझ्याकडे येत असते. ती तिच्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची काम घेऊन येत असते. आज मी जाहीर करतो की, सना मलिक ही पक्षाची प्रवक्ता असेल. एक मोठी जबाबदारी आपण तिला देत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्यांना संधी मिळत असते. सनाचं हिंदी, इ्ग्रजी चांगलं आहे, आता मराठीही चांगलं होईल, तू घाबरु नको, असंही अजित पवार म्हणाले. 

"वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते"

सना मलिक म्हणाल्या, अजितदादा आमच्या अडचणीत नेहमी आम्हाला मदत करतात. माझ्या वडिलांच्या अनुपस्थित आम्ही या मतदारसंघात काम करत असताना त्यावेळी अनेकांनी कट, कारस्थानं केली. काम करु दिली नाहीत. आमचं काम थांबवण्यासाठी प्रयत्न केले. पण प्रत्येकवेळी अजितदादांनी आम्हाला साथ दिली. म्हणून आम्ही सांगतो कामात संकटात उपायचं नाव दादा आहे, असं कौतुकही सना मलिक यांनी केलं. 

"अनेक दिवसांनी आपण एकत्र जमत आहोत, मुख्यमंत्री लाडकी योजना आता सुरू केली आहे. या योजनेचे फॉर्म भरताना अनेकांनी अफवा पसरवल्या, पण आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरुन घेतले. आम्ही १७ ऑगस्टची वाट बघत होतो, पण १४ ऑगस्ट दिवशीच लोकांनी फोन करुन पैसे आल्याचे सांगितले. हे ऐकून आम्ही समाधानी झालो. ज्या लोकांचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांचे आता फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे, असंही सना मलिक म्हणाल्या. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसनवाब मलिक