नवाब मलिकांचा मुलगा आता ईडीच्या रडारवर; लवकरच समन्स, आठवडाभरात चौकशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:12 AM2022-02-28T06:12:30+5:302022-02-28T06:13:10+5:30

नवाब मलिकांचा मुलगा फराज याला या आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते. 

Nawab Malik's son now on ED's radar; Summons coming soon, inquiries within a week? | नवाब मलिकांचा मुलगा आता ईडीच्या रडारवर; लवकरच समन्स, आठवडाभरात चौकशी?

नवाब मलिकांचा मुलगा आता ईडीच्या रडारवर; लवकरच समन्स, आठवडाभरात चौकशी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत ईडी खासगी डॉक्टर किंवा एम्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, त्यांचा मुलगा फराज याला या आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते. 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने नवाब मलिक यांच्यावर बुधवारी अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मात्र, अटकेनंतर दोन दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. येथील उपचार आणखीन काही दिवस सुरु राहणार असल्याचे समजते. त्यामुळे ईडी लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत खासगी डॉक्टर किंवा एम्सच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे.

आठवड्यात चौकशी?

अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांकडून तपासाला सहकार्य मिळत नसल्याने, ईडीने त्यांचा मोर्चा त्यांचा मुलगा फराजकडे वळवला आहे. लवकरच त्यांना समन्स बजावून या आठवड्यात चौकशीला बोलावले जाऊ शकते, अशी माहिती ईडी सूत्रांकडून मिळते आहे. कुर्ला जमीन व्यवहारात तो सक्रिय होता. फराज यानेच विक्री करारासह मालमत्तेशी संबंधित अन्य कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तसेच त्याने हसीना पारकर हिच्यासह तिच्या सहकाऱ्यांची भेट घेतली होती.

Web Title: Nawab Malik's son now on ED's radar; Summons coming soon, inquiries within a week?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.